लाखांदूर तालुक्यात पीक विमा जागृती रथ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:53+5:302021-07-15T04:24:53+5:30
शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांद्वारा खरिपात लागवड करण्यात येणाऱ्या विविध पिकांचा विमा काढला जातो. गत काही वर्षांपासून ...

लाखांदूर तालुक्यात पीक विमा जागृती रथ रवाना
शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांद्वारा खरिपात लागवड करण्यात येणाऱ्या विविध पिकांचा विमा काढला जातो. गत काही वर्षांपासून सबंधित विमा शासनाच्या एचडीएफसी ॲग्रो कंपनीतर्फे काढला जात आहे. खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांद्वारा शेतात लागवड केलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या आधारावर विमा कंपनी अंतर्गत आवश्यक नुकसान भरपाई मंजूर केली जाते.
गतवर्षी तालुक्यातील जवळपास २६ हजार धान तथा अन्य पीकधारक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. दरम्यान, गतवर्षी तालुक्यातील तब्बल तीनदा पूर, तुडतुडा, किडरोग व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, गतवर्षी विमा कंपनीद्वारे मिड सिजन ॲडव्हर्सिटी कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना कमी प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात आल्याने यंदा शेतकऱ्यांद्वारा पीक विम्याकडे पाठ दाखविल्याचाही आरोप केला जात आहे.
जनजागृती रथ रवाना करताना येथील तालुका कृषी अधिकारी दीपक पानपाटील, मंडळ कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड, कृषी सहाय्यक अतुल देशमुख, कापगते, कोरे, रामटेके, राउत, मेश्राम, योवले यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
140721\img-20210714-wa0013.jpg
पिकविमा जनजागृती रथाला झेंडी दाखवितांना दिपक पानपाटील व उपस्थित कृषी अधिकारी कर्मचारी