उद्दिष्टाच्या ६७ टक्केच पीक कर्ज वाटप

By Admin | Updated: July 14, 2015 01:09 IST2015-07-14T01:09:56+5:302015-07-14T01:09:56+5:30

खरीप हंगामातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट सरकारने बँकांना दिले असताना

Crop debt allocation of 67% of the target | उद्दिष्टाच्या ६७ टक्केच पीक कर्ज वाटप

उद्दिष्टाच्या ६७ टक्केच पीक कर्ज वाटप

देवानंद नंदेश्वर ल्ल भंडारा : खरीप हंगामातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट सरकारने बँकांना दिले असताना आतापर्यंत ६७ हजार ७२८ शेतकऱ्यांना ३१२ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टांच्या ६७ टक्के इतकेच असल्याचे दिसून आले आहे.

भंडारा जिल्ह्यात २३ पिक कर्जवाटप करणाऱ्या बँका आहेत. यात १८ राष्ट्रीयकृत, ३ खासगी, तर २ रिजनल रुरल बॅक व भंडारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा समावेश आहे. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४६४ कोटी २५ लाख रुपयांचे खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. मात्र खाजगी तसेच शासकिय बँकांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपाबद्दलची दाखविलेली अनास्था यामुळे उद्दिष्ठपुर्ती होऊ शकली नाही. मागील वर्षी ३९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. यात ६२ हजार ८१४ शेतकऱ्यांना २६४ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांना त्यावेळी कर्ज वाटप झाले होते.

जिल्हा बँकेने केले सर्वाधिक वाटप
आतापर्यंत सर्वाधिक पिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती बँकने बँकेने केले. त्याची टक्केवारी ८२ आहे. यापाठोपाठ विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ५७, राष्ट्रीयकृत बँक ४५, तर खासगी बॅकांनी केवळ १५ टक्के खरीप पिक कर्ज वाटप केले. मागीलवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकने १०५ टक्के, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ६०, राष्ट्रीयकृत बँकेने २० तर खासगी बॅकांनी केवळ १२ टक्के खरीप पिक कर्जवाटप केले होते.
पुनर्गठन ८.९२ कोटींचे
जिल्ह्यातील ८६३ शेतकऱ्यांपैकी आतापर्यत ७३३ शेतकऱ्यांच्या ८ कोटी ९२ लाख रुपयांच्या पिक कर्जाचे बँकांनी पुर्नगठण केले. वास्तविक पुर्नगठण यापेक्षा जास्त करावयास हवे होते. मात्र बँका तेही पुर्ण करू शकल्या नाही. ३५ शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यास नकार दिला आहे.

Web Title: Crop debt allocation of 67% of the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.