शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कारले पिकाला क्रॉप कव्हर ठरले लाखमोलाचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 5:00 AM

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोरे सदाबहार आहे. इस्त्राइल देशासारखी नियोजित तंत्रशुद्ध शेती चुलबंद खोऱ्यात अनुभवायला येत आहे. एकमेकांच्या सहकार्याने बागायती फुलविली जात आहे. पालांदूर परिसरात बागायतीत सर्वच पिके घेतली जातात. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला  कृषी विभागाचे सहकार्य प्रेरणादायी ठरत आहे. होतकरू बागायतदार धान शेतीपैकी किमान एक एकर शेतीत भाजीपाल्याची शेती साकारतो आहे. वर्षभर ताजा भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्याला मिळतो आहे.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : धान पीक शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने भाजीपाला पिकाकडे जिल्ह्यातील शेतकरी वळलेला आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात अनेक शेतकरी बारमाही भाजीपाल्याची शेती करतात. भाजीपाल्यात कारले, चवळी, यांचे ड्रिप मल्चिंगवर लागवड केलेली आहे. कारले पिकाला सुरक्षेकरिता कापडाचे आच्छादन अर्थात क्राप कव्हर लाख मोलाचे ठरलेले आहे. क्राप कव्हरमुळे पिकाला चाळीस दिवस पर्यंत अजिबात फवारणीची गरज पडत नाही हे विशेष !लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोरे सदाबहार आहे. इस्त्राइल देशासारखी नियोजित तंत्रशुद्ध शेती चुलबंद खोऱ्यात अनुभवायला येत आहे. एकमेकांच्या सहकार्याने बागायती फुलविली जात आहे. पालांदूर परिसरात बागायतीत सर्वच पिके घेतली जातात. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला  कृषी विभागाचे सहकार्य प्रेरणादायी ठरत आहे. होतकरू बागायतदार धान शेतीपैकी किमान एक एकर शेतीत भाजीपाल्याची शेती साकारतो आहे. वर्षभर ताजा भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्याला मिळतो आहे. गत पावसाच्या दिवसात कोरोनाच्या संकटात भाजीपाल्याची शेती संकटात आली होती. भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. परंतु जिद्द, चिकाटी, हेवा कायम ठेवीत चुलबंद खोऱ्यातील बागायतदारांनी पुन्हा कारली, चवळी बाग फुलविलेली आहे. संकटावर मात करुन भाजीपाला उत्पादकांनी कारली, चवळीची बाग फुलविली असली तरी वातावरणाचे संकट आहे.

शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त अमृत मदनकर यांची भेट- चुलबंद खोऱ्यातील कारले उत्पादनात अख्ख्या गावाला प्रेरणा देणारे गावचे सरपंच अमृत मदनकर यांची योगायोगाने पालांदूर येथे विभागीय कृषी सहसंचालक, कृषी अधिकाऱ्यांशी भेट झाली. यात कारले उत्पादनाच्या अनुषंगाने अमृतने अमृतवाणीने कडू कारले पिकविण्याचा गोड अभ्यास सांगितला. त्यात क्राप कव्हरची माहिती लाख मोलाची ठरली. शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याकरिता क्राप कव्हरला शासकीय अनुदान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.  

विदर्भाचे कॅलिफोर्निया चुलबंद खोरे!- कृषी अभ्यासकांना चुलबंद खोरे खुणावते आहे. चुलबंद खोऱ्याच्या मातीतील दम भाजीपाल्याची गुणवत्ता दाखवतो आहे. त्याची चव खवय्यांना भुरळ घालणार नाही तर नवल!, हे केवळ ऐकिवात असल्याने प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग कृषी अभ्यासक टाळणार नाही हे निश्चित. नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले लाखनी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नकळत त्यांनी चुलबंद खोऱ्याचा अनुभव घेण्याकरिता सहकारी कृषी अधिकाऱ्यांना गळ घातली. थेट चुलबंद खोऱ्यात फळबाग, फूल शेती, भाजीपाल्याची शेती, ग्रास डिस्टिलेशन यासारख्या शेतात भेटी देत शेतकऱ्यांच्या श्रमाचे कौतुक केले. त्यांच्या जिद्दीला, मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याची सूचना उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे , तालुका कृषी अधिकारी किशोर पाथरीकर, मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांना केली.

शेतकऱ्यांनी जैविक किटकनाशकाचा सुरुवातीपासून वापर करावा. शक्यतो कमीत कमी रासायनिक किटकनाशकाचा उपयोग साधावा. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार प्रत्येक भाजीपाल्यावर कीडनाशकाची योग्य ती शिफारस केलेली आहे. त्याच नियोजनाने कीडनाशक नियंत्रणाकरिता फवारणी करावी.-रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर.

 

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती