गुन्ह्याचा आलेख कमी : गस्तीची गरज

By Admin | Updated: February 28, 2015 00:47 IST2015-02-28T00:47:37+5:302015-02-28T00:47:37+5:30

अड्याळ पोलीस ठाणे ब्रिटीश कालीन असून या ठाण्यांतर्गत सर्वच धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत सदर ठाण्याअंतर्गत ९० हजार ५१३ लोकसंख्या असून हे क्षेत्र शांतता प्रिय म्हणून ओळखले जातो.

Crime Less: The Need for Speed | गुन्ह्याचा आलेख कमी : गस्तीची गरज

गुन्ह्याचा आलेख कमी : गस्तीची गरज

अड्याळ / चिचाळ वार्ताहर
अड्याळ पोलीस ठाणे ब्रिटीश कालीन असून या ठाण्यांतर्गत सर्वच धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत सदर ठाण्याअंतर्गत ९० हजार ५१३ लोकसंख्या असून हे क्षेत्र शांतता प्रिय म्हणून ओळखले जातो. पोलीस निरीक्षक अजाबराव नेवारे सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, डांगे यांनी गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यामध्ये त्यांना यश आले आहे. कारण त्यांनी आखलेल्या सुनियोजित आराखडा व जनतेची विश्वास आहे. ही बाब अड्याळ पोलीस ठाण्यासाठी गौरवाची ठरली आहे.
७९ गावे सांभाळताना कसरत
अड्याळ पोलीस ठाणेअंतर्गत एकूण ७९ गावे येत असून अड्याळ शहराचा त्यात समावेश होतो. यामध्ये अड्याळ, गोसे बु., चिखली, माडगी, पहेला, कोंढा बिटाचा समावेश आहे. अड्याळ पोलीस ठत्तण्याचे ४ हजार ६८० चौरस कि़मी. लांब आहे. या ठाण्यांतर्गत गोसेखुर्द धरण येत असल्याने पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांना त्याकडे लक्ष द्यावे लागते. अड्याळ आणि कोंढा येथील बाजारपेठ सर्वदुर परिचित असल्याने कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था सांभाळताना पोलिसासाठी दमछाक होत असली तरी नुकतेच ठाणेदार म्हणून आलेले अजाबराव नेवारे आल्यामुळे अड्याळ ठाणे क्षेत्रातील गुन्हेगारीचा आलेख घटल्यचे दिसून येत आहे.
सदनिका जुन्या पण नूतनीकरण केलेल्या
अड्याळ ठाण्याच्या आवारात अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यासाठी सदनिका बांधलेल्या आहेत. या सदनिकेत काही अधिकारी कर्मचारी सोडले तर बरेच पोलीस कर्मचारी सदनिकेत वास्तव्यास आहेत. सदनिका जुन्या असल्या तरी त्याची योग्य प्रकारे डागडूजी रंगरंगोटी केल्याने त्या सुंदर व देखन्या दिसत आहेत. मात्र नाल्याची दुरावस्था असल्याचे दिसते. ठाणेदाराचे निवास कक्ष व सहायक फौजदार व पोलीस उपनिरीक्षक यांचे स्वतंत्र कक्ष आहेत. पोलीस ठाण्यात पुरूष व महिला आरोपीन करीता स्वतंत्र कोठडी आहे.
शहर व गावात गस्तीची गरज
अड्याळ शहरात पोलिसांची गस्त नियमितपणे सुरू आहे. त्यामानाने खेडे विभागात गस्तीचे प्रमाण नग्यन आहे. रात्री ११ ते ५ वाजेपर्यंत गस्त सुरू असते. पोलीस निरीक्षक व कर्मचारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा पेट्रोलींग करीत असतात.
पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा अभाव
पोलीस ठाणे अड्याळ हे गाव राष्ट्रीय मार्गे क्रमांक २७१ वर असून पूर्व ते पश्चिम १० ते १५ कि़मी. व उत्तर ते दक्षिण १२ ते १५ कि़मी. असे क्षेत्रफळ आहे. यात ७९ गावाचा समावेश आहे. त्या मानाने येथे पोलीस कर्मचारी अपुरे आहेत. अड्याळ ठाण्याअंतर्गत ९ अधिकारी व ३२ कर्मचारी पदे मंजूर आहेत. परंतु ३ पोलीस अधिकारी असून ३० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. ६ अधिकारी २ पोलीस कर्मचारी पदे मंजुर आहेत. परंतु ३ पोलीस अधिकारी असून ३० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. ६ अधिकारी २ पोलीस कर्मचारी व २ पोलीस कर्मचारी प्रसुती रजेवर असल्याने ७९ गावाचा फायदा व सुव्यवस्था राखत असताना पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण येतो.
पोलिसांचे स्तुत्य उपक्रम
पोलीस ठाण्यातर्फे राबविण्यात आलेल्या एक गाव एक गणपती या मोहिमेत अनेक गावांनी उत्स्फूर्तेने भाग घेतला. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक एकता घडवून आणली तसेच तंटामुक्त मोहिमे अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीनी भाग घेवून गावातले तंटै गावातच मिटवल्यामुळे पोलिसावरचा ताण कमी झाला आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह, महिला समुपदेशन केंद्र, पतनाट्य गावा गावात ग्रामसभा घेवून जागृतीतून अनेक समस्या मार्गी लावल्या तसेच ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६१ गावात पोलिसाच्या पुढाकाराने दारूबंदी घडवून आणण्यात आली. मटका जुगार व सट्टा या धंद्यावरही पोलिसांनी लगाम कसलेला आहे. पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षाची महिन्यातून एकदा बैठक घेण्यात येते.
घोड्याची यात्रा
अड्याळ येथील विदर्भातील जागृत हनुमंताचे मंदीर असून येथे रामनवमीला नऊ दिवसाची घोडायात्रा भरते. त्यावेळी बंदोबस्त करताना अपुऱ्या पोलिसांना बंदोबस्त ठेवताना नाकी नव येत असते, अशावेळी ठाण्यांतर्गत येणाऱ्या एखाद्या गावात अनुचित घटना घडल्यास पोलिसांची तारांबळ उडते.
गोसे बिटला पोलीस चौकीची गरज
सदर बिटमध्ये विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प असून येथे देश विदेशातील पर्यटकांची रोजच वर्दळ असते. त्याचे आणि धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोसे येथे पोलीस चौकीची गरज असल्याचे अनेक पर्यटकांचे म्हणणे आहे.

Web Title: Crime Less: The Need for Speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.