शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

काेराेना वर्षात गुन्ह्यांचा आलेख घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 11:39 PM

काेराेना संसर्गामुळे घाेषित लाॅकडाऊन आणि पाेलिसांची गस्त यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख घटल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जाताे. तसेही गुन्ह्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी असते. त्यातच २०२० मध्ये काेराेना महामारीने आणखी गुन्हे घटल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये खुनाच्या २२ घटना घडल्या हाेत्या, तर २०२० मध्ये १७ खुनाच्या घटना घडल्या. 

ठळक मुद्देलाॅकडाऊनचा परिणाम : खून, अपहरण, प्राणघातक हल्ला, महिला अत्याचाराच्या घटना कमी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना महामारीने गत वर्षात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. सर्वच घटकांवर काेराेनाचा प्रभाव दिसून येत आहे. अशा स्थितीत मात्र जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख घटल्याचे काेराेना वर्षात दिसून येत आहे. २०१९ मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या तीन हजार ३९७ नाेंदविण्यात आली हाेती. तर २०२० च्या ३० नाेव्हेंबरपर्यंत एकूण गुन्ह्यांमध्ये १८३ गुन्हे कमी झाल्याचे दिसून येत आहे. खून, प्राणघातक हल्ला, महिला अत्याचार, अपहरण, जुगार, अवैध दारू, फसवणूक आदी घटना घडल्या आहेत. काेराेना संसर्गामुळे घाेषित लाॅकडाऊन आणि पाेलिसांची गस्त यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख घटल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जाताे. तसेही गुन्ह्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी असते. त्यातच २०२० मध्ये काेराेना महामारीने आणखी गुन्हे घटल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये खुनाच्या २२ घटना घडल्या हाेत्या, तर २०२० मध्ये १७ खुनाच्या घटना घडल्या. प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये २०२० मध्ये १७ तर २०१९ मध्ये २६ घटना घडल्या हाेत्या. २०१९ मध्ये बलात्काराच्या ६३ घटनांची नाेंद करण्यात आली, तर गतवर्षी ५४ घटना नाेंदविण्यात आल्या.  अपहरण, हरविले आदींच्या २०१९ मध्ये १०८ घटनांची नाेंद करण्यात आली हाेती. गतवर्षी केवळ ६९ घटनांची नाेंद झाली आहे.अपघाती मृत्यूचे प्रमाणही गतवर्षी घटल्याचे दिसून येते. २०२० मध्ये १२२ जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर २०१९ मध्ये १४१ लाेकांचा मृत्यू झाला हाेता. फसवणुकीच्या घटना जवळपास सारख्याच दिसून येतात. २०१९ मध्ये ६० तर २०२० मध्ये ५८ घटनांची नाेंद झाली.जुगार आणि अवैध दारूच्या प्रकरणातही घट झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये जुगाऱ्याच्या ३४८ केसेस करण्यात आल्या हाेत्या, तर २०२० मध्ये २७७ घटनांची नाेंद घेण्यात आली. अवैध दारू प्रकरणात गतवर्षी १४७१ केसेस दाखल झाल्या असून, २०१९ मध्ये ही संख्या १५७६ हाेती. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव रुजू हाेताच त्यांनी पाेलीस दलात व्यापक फेरबदल केले. अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याचे सक्त निर्देश दिले. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख घटत आहे. यासाेबत काेराेना लाॅकडाऊनमुळे नागरिक घरातच हाेते, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळेही घटना कमी झाल्या.

चाेरीच्या घटनांत वाढ लाॅकडाऊनच्या काळातगुन्ह्यांची संख्या दरवर्षी बदलत असते. गतवर्षी २०२० मध्ये काेराेना लाॅकडाऊनमुळे नागरिक घरातच हाेते. पाेलिसांचा बंदाेबस्तही तगडा हाेता. रात्रगस्तही वाढविण्यात आली हाेती. त्यामुळे गुन्ह्याचा दर घटला आहे. चाेरीच्या प्रकरणात बाहेरून आलेल्या व्यक्तींनी चाेरी केल्याचे पुढे आले. त्यामुळे चाेरींच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. चाेऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययाेजना तयार केली आहे. - वसंत जाधव, जिल्हा पाेलीस अधीक्षक भंडाराही जिल्ह्यात गतवर्षी चाेरीच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येते. दराेडा, घरफाेडी आदी घटना तुलनात्मकदृष्ट्या कमी झाल्या असल्या तरी चाेरीच्या घटना वाढल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये ३० नाेव्हेंबरपर्यंत चाेरीच्या ४०२ घटनांची नाेंद करण्यात आली हाेती. गतवर्षी नाेव्हेंबरपर्यंत ४९० चाेरीच्या घटनांची नाेंद करण्यात आली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस