दोन्ही गटांतील ३९ जणांवर गुन्हे

By Admin | Updated: December 23, 2016 00:29 IST2016-12-23T00:29:50+5:302016-12-23T00:29:50+5:30

नगर पालिका निवडणुकीच्या वादातून बुधवारला लायब्ररी चौकात दोन गटात झालेल्या मारहाणीचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे.

Crime in 39 cases in both groups | दोन्ही गटांतील ३९ जणांवर गुन्हे

दोन्ही गटांतील ३९ जणांवर गुन्हे

दुकाने बंदच : लायब्ररी चौकात दुसऱ्या दिवशीही तणावसदृष्य स्थिती
भंडारा : नगर पालिका निवडणुकीच्या वादातून बुधवारला लायब्ररी चौकात दोन गटात झालेल्या मारहाणीचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे. या परिसरात तणावसदृष्य स्थिती कायम असून त्या परिसरातील दुकाने आजही बंदच होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त असून दोन्ही गटातील ३९ जणांविरूद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नगर पालिका निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांकडून तलवारी निघाल्या. या घटनेत दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. त्यामुळे या परिसरात बराच वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती, ती स्थिती आजही कायम होती. चौकातील फुटपाथवरील फेरीवाले तथा अन्य दुकाने बंद होती. यावरून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कालपासून या परिसरात पोलीस ताफा तैनात आहे. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यसाठी पोलिसांची करडी नजर यासंपूर्ण प्रकरणावर आहे.
यादरम्यान एका गटातर्फे फिर्यादी मकसुद खान मंजूर खान रा.भंडारा तथा दुसऱ्या गटातील फिर्यादी ईमरान बबलुभाई मिर्झा रा.भंडारा यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंवि ३२३, ३२४, ३२६, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, सहकलम १३५ महाराष्ट पोलिस कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहेत. यात एका गटातील १९ तर दुसऱ्या गटातील २० जणांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक मोरे व गायकवाड करीत आहेत. (प्रतिनिधी)

शहरातील अतिक्रमण हटवा
भंडारा नगर पालिका प्रशासनाने मागीलवेळी शहरातील अतिक्रमण हटविले होते. त्यानंतर काही दिवसातच संपूर्ण शहरातच अतिक्रमणाने पाय पसरले. याला मुख्य मार्ग, लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौकही अपवाद नाही. अतिक्रमणामुळे चौकाचे सौंदर्य झाकले गेले आहे. आधीच रस्ता अरूंद असताना वाढत्या अतिक्रमाणमुळे या समस्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मुलनावर ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Web Title: Crime in 39 cases in both groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.