क्रिकेट सामना; सट्टा बाजार जोरात!
By Admin | Updated: March 26, 2015 00:30 IST2015-03-26T00:30:59+5:302015-03-26T00:30:59+5:30
विश्वकप क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरीत भारत व आस्ट्रेलिया चा सामना होत आहे.

क्रिकेट सामना; सट्टा बाजार जोरात!
तुमसर : विश्वकप क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरीत भारत व आस्ट्रेलिया चा सामना होत आहे. सातासमुद्रापार ही झूंज होत असली तरी शहरात या स्पर्धेवर लाखोंचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे. या व्यवसायाचे तार गोंदिया व नागपूरच्या बुकींशी जुळल्याची माहिती आहे.
कुबेरनगरी म्हणून तुमसरची ओळख असून सध्या तुमसरात क्रिकेट ‘फिवर’ चढल्याचे दृश्य तालुक्यात आहे.
या क्रिकेट स्पर्धेतून आर्थिक फायदा व्हावा याकरिता विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच सट्टा त्यावर खेळणे सुरू झाले होते. गुरूवारी उपांत्य सामना भारत व आस्ट्रेलिया या संघादरम्यान होत आहे. याकरिता बुकींनी आपले एजेन्ट सक्रीय केले आहेत. आस्ट्रेलिया संघाला सध्या झुकते माप देण्यात आले आहे. एक रूपयाला ४५ पैसे असा भाव आस्ट्रेलिया संघाचा आहे, अशी माहिती आहे. भारताचा भत्तव १ रूपया आहे.
सट्टा खेळणारे येथे संभ्रमात आहेत. तुमसरचे तार गोंदिया व नागपूरच्या बुकींशी जुळल्याची माहिती आहे. स्थानिक स्तरावर या बुकींचे दोन ते तीन प्रमुख एजेन्ट असतात. या एजेन्टांचे सब एजेन्ट आहेत. सर्वसामान्य नागरिकांना त्यांची माहिती नाही. गोपनीय पद्धतीने हे नेटवर्क सुरू आहे. सायबर, मोबाईल या आधुनिक तंत्रज्ञानाचा येथे उपयोग होत असल्याने गृहखाते अनभिज्ञ दिसत आहे. शहरात या सट्ट्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यात काही मोठी रक्कम गमावून बसतील तर काही रक्कम जिंकतील, सध्या येथे सट्टाबाजार मात्र जोरात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)