भंडारेकरांमध्ये वाहनांच्या फॅन्सी नंबरची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:11+5:302021-06-29T04:24:11+5:30
भंडारा : कोरोना संकटकाळात दुचाकीसह चारचाकी वाहनांची विक्री मंदावली होती. आता पुन्हा एकदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र ...

भंडारेकरांमध्ये वाहनांच्या फॅन्सी नंबरची क्रेझ
भंडारा : कोरोना संकटकाळात दुचाकीसह चारचाकी वाहनांची विक्री मंदावली होती. आता पुन्हा एकदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र चारचाकी व दुचाकी खरेदी करताना भंडारेकरांमध्ये फॅन्सी नंबरची क्रेझ पाहायला मिळत आहे. सदर नंबर किंवा हटके क्रमांक मिळविण्यासाठी तरुण वर्गही धडपडताना दिसतात. गत दोन वर्षात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भंडाराला अशा फॅन्सीनंबरसाठी जवळपास २६ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात दुचाकीसह चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही नवीन वाहन खरेदी करताना आपल्याला वाहनांचा विशेष नंबर मिळावा, यासाठी ग्राहक आग्रही असतात. विशेषतः वाढदिवस, दिनविशेष किंवा प्रियजनांच्या वाढदिवसात आवडत्या नंबरसाठी विशेष मागणी केली जाते. यात ०१, ०५, १०१, ६०६, ५५५, ९९९, ३३३३ यासह अन्य क्रमांकासाठी रस्सीखेच असते. उल्लेखनीय म्हणजे १११, ७८६ नंबरसाठी अनेकजण वेटिंगवर असतात, अशा नंबरची सर्वात जास्त मागणी असल्याचेही दिसून येते.
कोट बॉक्स
मागणीनुसार वाटप
दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर मागणीनुसार व यादीप्रमाणे
नंबरचे अलॉटमेंट केले जाते. या नंबर पोटी परिवहन कार्यालयाला महसूलही उपलब्ध होत असतो. यासाठी उपप्रादेशिक
परिवहन विभाग सदैव तत्पर असते. सर्व कारवाई नियमाप्रमाणे केली जात असते.
-राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा
बॉक्स
तर नंबरसाठी होतो लिलाव
वाहनांची पासिंग झाल्यावर मिळणारा नंबर आपल्या मनासारखा हवा यासाठी
काहीजण वाटेल ती रक्कम मोजायला तयार असतात. मात्र एकच नंबरची अनेकांनी मागणी केली असेल तर वेळप्रसंगी लिलावही केला
जात असतो. मात्र असे क्वचितच घडत असते.
बॉक्स
कोरोना काळातही हौसेला मोल नाही
गतवर्षीपासून व संचारबंदीमुळे वाहनांच्या विक्रीत थोडीफार घसरण पाहायला मिळते. मात्र कोरोना काळातही फॅन्सी नंबरची क्रेझ असलेल्यांमध्ये अतिरिक्त शुल्क देऊन नंबर घेण्याची ओढ कमी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे फॅन्सी नंबर किंवा आपला आवडता वाहन क्रमांक मिळविण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ पाहायला मिळते.