कडधान्याला भावच नाही; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:14 IST2018-03-11T22:14:22+5:302018-03-11T22:14:22+5:30

शाश्वत उत्पन्न वाढीकरिता खूप मोठा उहापोह शासनाच्या वतीने होत आहे. मात्र त्या दिशेने विकासात्मक पाऊल केवळ बोलके ठरत असल्याने शेतकरी सुमार अडचणीचा सामना करीत आहे.

Crab does not have any emotion; Farmer worries | कडधान्याला भावच नाही; शेतकरी चिंतेत

कडधान्याला भावच नाही; शेतकरी चिंतेत

ठळक मुद्देशासन-प्रशासनाचे दुर्लक्ष : आर्थिक स्तर कसा उंचावणार?

मुखरु बागडे ।
आॅनलाईन लोकमत
पालांदूर चौ.: शाश्वत उत्पन्न वाढीकरिता खूप मोठा उहापोह शासनाच्या वतीने होत आहे. मात्र त्या दिशेने विकासात्मक पाऊल केवळ बोलके ठरत असल्याने शेतकरी सुमार अडचणीचा सामना करीत आहे. हातात असलेल्या कडधान्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. यात दोष कुणाचा? यावर चर्चेचे चर्वण करीत शासनाच्या दुर्लक्षित धोरणावर टिका होत आहे.
शेतकरी चहुबाजुने हैराण झाला आहे. धान शेती परवडत नसल्याने बागायती शेतीकडे लक्ष पुरवित भाजीपाल्याची शेती फुलविली. जीव ओतून बाग प्रसन्न ठेवली. उत्तम दर्जात पिकेही निघाले. मात्र बाजारात टमाटर, कोबी, वांगे आदींना अत्यल्प भाव मिळत निराशेने मात्र न काढण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. शून्य मशागतीत हातात येणारे पिक म्हणजे कडधान्य. कडधान्याची शेती वर्षभराचा तेलमिकट मिढाचा खर्च भागवित गरीबांची चूल पेटण्याची क्षमता असते.
लाखोरी १४, हरभरा ३२, उळीद-मुंग ३८, तुळ ४२ रुपये प्रतिकिलो या भावात विक्री सुरु आहे मात्र व्यापारी आपले उखळ पांढरे करण्याच्या बेतात शेतकºयांला बेजार करीत आहेत. शासन केवळ व्यापाºयांचे हित साधत शेतकºयांवर अन्याय करीत आहे.
लोकप्रतिनिधी, विरोधक याविरोधात अजीबात आवाज उठवायला तयार नसल्याने सामान्य गरीब शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. शेतकºयांच्या नावावर फक्त राजकारण होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.

Web Title: Crab does not have any emotion; Farmer worries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.