शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज उत्खनन प्रकरणी भंडारा कलेक्टरच्या निर्णयाला न्यायालयाने दिली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:33 IST

Bhandara : परसोडीतील घाट मालकाला नागपूर खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवीन गौण खनिज खनन कायद्याच्या अंमलबजावणी अंतर्गत परसोडी (ता. साकोली) येथील वाळू घाटावर खासगी व्यावसायिकांनी डेपोमधील वाळूची आपसात विल्हेवाट केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

पारंपरिक उत्खननामध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'महाखनिज' प्रणालीमार्फत निविदा काढून खासगी व्यक्तींना नदीपात्रातील वाळू उपसा करण्याची परवानगी दिली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये निघालेल्या जाहीर लिलावाच्या जाहिरातीनुसार पारसोडी येथील खासगी कंत्राटदाराने वाळू घाटातील वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी जिल्हा खनन विभागामार्फत परवानगी प्राप्त केली होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये घाट सुरू झाला होता. तो अलीकडेपर्यंत सुरू होता. त्यावर नोटीस बजावण्यात आली होती.

जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली होती. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाचे न्या. अनिल पानसरे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी तहसीलदारांच्या वसुली नोटिसीला तात्पुरती स्थगिती दिली.

असे आहे प्रकरण

  • जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित घाट कंत्राटदारावर अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि तहसीलदारांचा अहवाल ग्राह्य धरून १० सप्टेंबर २०२५ ला पेनाल्टी ऑर्डर पाठविला होता.
  • त्यानंतर १७ सप्टेंबरला वसुली आदेश काढला होता. त्यानुसार, कंत्राटदाराने भरलेली अनामत रक्कम दंड म्हणून पाच लाख रुपये जप्त करण्याबाबत, तसेच वाढू डेपोतील शिल्लक काही ब्रास वाळूची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या कारणावरून १० लाख ९ हजार ३८० रुपयांचा दंड म्हणून भरण्याची नोटीस कंत्राटदाराला बजावण्यात आली होती.
English
हिंदी सारांश
Web Title : Court stays Bhandara Collector's order in minor mineral excavation case.

Web Summary : Nagpur High Court temporarily suspended Bhandara Collector's order against a contractor regarding sand excavation violations in Parosdi. The contractor challenged penalties for alleged breaches and unauthorized sand disposal. The court put a stay on recovery notices.
टॅग्स :bhandara-acभंडाराMining Scamखाण घोटाळाHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर