२० टेबलवर होणार मतमोजणी
By Admin | Updated: October 18, 2014 22:58 IST2014-10-18T22:58:50+5:302014-10-18T22:58:50+5:30
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारला सकाळी ८ वाजतापासून सुरु होणार आहे. यासाठी २०० कर्मचाऱ्यांची मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२० टेबलवर होणार मतमोजणी
भंडारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारला सकाळी ८ वाजतापासून सुरु होणार आहे. यासाठी २०० कर्मचाऱ्यांची मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी बंदोबस्तासाठी ५२४ पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अनुक्रमे आयटीआय तुमसर, पोलीस बहुउद्देशिय सभागृह भंडारा आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सेंदूरवाफा साकोली येथे होणार आहे. त्याकरिता तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीकरिता २० टेबल निश्चित करण्यात आले आहे. तुमसर येथे १८ मतमोजणी फेऱ्या, भंडारा येथे २३ तर साकोली येथे २१ मतमोजणी फेऱ्या होतील. तिनही विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीकरिता प्रत्येक टेबलवर केंद्र शासनाचे सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे.
मतमोजणी बंदोबस्तासाठी तुमसर विधानसभा क्षेत्रासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस व इतर १५ इतर कर्मचारी तसेच २ अर्धसैनिक दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आले आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ६ पोलीस निरीक्षक, १७ पोलीस उपनिरीक्षक, १३४ पोलीस कर्मचारी, ४२ इतर कर्मचारी तसेच अर्धसैनिक दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आले आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ४ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक, ११० पोलीस कर्मचारी, २० इतर कर्मचारी तसेच अर्धसैनिक दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आले आहे.
भंडारा येथे नियंत्रण कक्षामध्ये १ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरीक्षक, ४० कर्मचारी आणि १० इतर कर्मचारी ठेवण्यात आले. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस बल आणि केंद्रीय सुरक्षा दलाची प्रत्येक १ कंपनी सुरक्षेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)