जणगणना म्हणजे डोके मोजणे नव्हे
By Admin | Updated: June 5, 2014 23:49 IST2014-06-05T23:49:55+5:302014-06-05T23:49:55+5:30
ओबीसी समाजाची जनगणना करणे म्हणजे ओबीसीेंचे डोके मोजणे नव्हे, १९३१ मध्ये इंग्रज सरकारने ओबीसी समाजाची जनगणना केली. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत शासनाने जनगणना केली नाही.

जणगणना म्हणजे डोके मोजणे नव्हे
ओबीसी जनजागरण मेळावा : भैय्याजी लांबट यांचे प्रतिपादन
भंडारा : ओबीसी समाजाची जनगणना करणे म्हणजे ओबीसीेंचे डोके मोजणे नव्हे, १९३१ मध्ये इंग्रज सरकारने ओबीसी समाजाची जनगणना केली. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत शासनाने जनगणना केली नाही. ६५ वर्षाच्या काळातही ओबीसीची मुळ संख्या माहिती नाही. सरकारने संसदेत घोषणा करूनही ओबीसीची जनगणना न करणे म्हणजे ओबीसी समाजाचा अपमान करणे होय, असे प्रतिपादन भैय्याजी लांबट यांनी केले.
ओबीसी सेवा संघ, भंडारा द्वारा हत्तीडोई येथे ओबीसी सेवा संघ हत्तीडोई शाखेच्या वतीने ओबीसी जनजागरण मेळावा व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जनजागरण मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी सुखदेव लांजेवार रमाकांत पशिने होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भैय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, वहिद शेख, नाना बांडेबुचे, जयदेव पडोळे आदी उपस्थित होते. यावेळी गोपाल सेलोकर म्हणाले, ओबीसीची संख्या निश्चित नसल्यामुळे प्लॉनिंग कमिशन ओबीसींना वाटप संख्या नुसार करीत नाही. भिकारी जेवढी भिक घेतो तेवढी भीक ओबीसी समाजाला मिळत आहे.
सुखदेव लांजेवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांची शिक्षण घेतले पाहिजे, शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही तर ओबीसींना रस्त्यावर येवून संघर्ष केला पाहिजे, रमाकांत पशिने यांनी संघटना ओबीसी समाजांना प्रबोधन करतो. त्यांनी घरी जावून विचार करावा खोटे आहे की खरे आहे यांची जाणीव करावी फक्त प्रबोधन ऐकू नका तर त्यावर विचार मंथन करून ओबीसी बांधवांनों जागे होवून स्वत:ला सिद्ध करा. संचालन जागेश्वर पडोळे यांनी केले. आभार ग्रा.पं.सदस्य जयदेव पडोळे यांनी केले. जनजागरण मेळावा स्पर्ध परीक्षा मार्गदर्शन यशस्वी करण्याकरिता मुख्य आयोजक शंबू बांडेबूचे, सुधाकर मोथरकर, रजत कारेमोरे, रूपेश लांजेवार, दिनेश मारबते, आशिष पडोळे, लक्ष्मीकांत भाजीपाले, संदीप ईश्वरकर, मंदीश्वर भोंगाडे, अविलाल लांजेवार, लक्ष्मीकांत भोंगाडे, पवन सोनवाने यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)