‘त्या’ बिबट्याला पकडण्यासाठी आला दोन लाख रुपयांचा खर्च

By Admin | Updated: November 27, 2014 23:27 IST2014-11-27T23:27:49+5:302014-11-27T23:27:49+5:30

तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील मळाबाई बावणे या वृद्धेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पाऊणे दोन लाख रुपये खर्च झाले. हा जेरबंद बिबट्या जखमी असून

The cost of two lakh rupees came to catch the 'leopard' | ‘त्या’ बिबट्याला पकडण्यासाठी आला दोन लाख रुपयांचा खर्च

‘त्या’ बिबट्याला पकडण्यासाठी आला दोन लाख रुपयांचा खर्च

साकोली : तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील मळाबाई बावणे या वृद्धेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पाऊणे दोन लाख रुपये खर्च झाले. हा जेरबंद बिबट्या जखमी असून त्याच्यावर दररोज मांस आणि औषधोपचाराची चमू तैनात करण्यात आली आहे. सध्या या बिबट्याचा मुक्काम गडेगाव लाकूड आगार येथे असून जखमी असल्यामुळे सध्यातरी अन्यत्र कुठेही हलविण्याचे आदेश आले नाहीत.
साकोली तालुक्यातील जांभळी खांबा येथे बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी दोनशे वनकर्मचारी लावण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्यांचे जेवण, वाहनासाठी इंधन यावर सहा दिवसात १ लाख ७५ हजार रुपये खर्च झाले. हा खर्च भंडारा वनविभागातर्फे करण्यात आला. आता औषधोपचारावर दररोज हजारो रुपये खर्च होत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The cost of two lakh rupees came to catch the 'leopard'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.