लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST2021-03-04T05:06:19+5:302021-03-04T05:06:19+5:30

श्रीकांत बाबूराव साखरवाडे असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. तो श्रीराम हायस्कूलचा मुख्याध्यापक आणि श्रीराम शिक्षण संस्थेचा सचिव आहे. चौथ्या ...

Corrupt headmaster in ACB's net | लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

श्रीकांत बाबूराव साखरवाडे असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. तो श्रीराम हायस्कूलचा मुख्याध्यापक आणि श्रीराम शिक्षण संस्थेचा सचिव आहे. चौथ्या वेतन आयोगाचे थकबाकीचे देयक तयार करून देणे, जुलै १९९९ ते जून २००१ चे थकीत वेतन देयक पथकाकडे पाठविणे आणि सेवा समाप्ती प्रकरणातील २००३ ते २००७ या सेवानिवृत्ती कालावधीतील काल्पनिक वेतनवाढ लावून सेवापुस्तिका अद्ययावत करणे आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवणे यासाठी तक्रारदाराच्या सासऱ्याला पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली. चौकशी करून मंगळवारी सकाळी सापळा रचण्यात आला. सकाळी १० वाजताच्या सुमारास देव्हाडी येथे १० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने तुमसरच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, कुरंजेकर, रोशनी गजभिये, सुनील हुकरे, दिनेश धार्मिक, राजेंद्र कुरुडकर, कुणाल कडव, दीपिका राठोड यांनी केली.

Web Title: Corrupt headmaster in ACB's net