कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:17+5:302021-07-04T04:24:17+5:30

भंडारा : काेराेनाने मृत्यू झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे अशा कुटुंबांतील पात्र व्यक्तींना अनुकंपा ...

Corona's statement to help the family of the deceased | कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी निवेदन

कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी निवेदन

भंडारा : काेराेनाने मृत्यू झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे अशा कुटुंबांतील पात्र व्यक्तींना अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी मिळावी, तसेच काेराेनाकाळात कर्तव्यावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान मिळावे, याकरिता खाजगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पंचायत समिती, तुमसरच्या कार्यालयासमाेर कुटुंबीयांसहित निदर्शने करणार असल्याचे निवेदन गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांना देण्यात आले.

पीडित कुटुंबांनी तसेच इतर शिक्षकांनीही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रमाेद रेवतकर, केंद्रीय सचिव विजय नंदनवार, लाेकपाल चापले, अरुण माेखारे, प्रेमलाल मलेवार, जयंत पंचबुद्धे, अशद शेख, पारधी, कटरे, हजारे, सिंदपुरे, डोंगरे, उताणे, परतेके, पटले, ठाकरे, पीडित कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित हाेते.

Web Title: Corona's statement to help the family of the deceased