कोरोना पार्श्वभूमीवर लाखांदुरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:32+5:302021-04-08T04:35:32+5:30

०७ लोक ०९ के लाखांदूर : कोरोना चाचणी दरम्यान तालुक्यात नियमित कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचा ...

Corona tightly closed in the background | कोरोना पार्श्वभूमीवर लाखांदुरात कडकडीत बंद

कोरोना पार्श्वभूमीवर लाखांदुरात कडकडीत बंद

०७ लोक ०९ के

लाखांदूर : कोरोना चाचणी दरम्यान तालुक्यात नियमित कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचा संभाव्य संक्रमण टाळण्यासाठी स्थानिक लाखांदुरात ७ एप्रिलला कडकडीत बंद पाळण्यात आला. हा बंद कोरोना पार्श्वभूमीवर येथील नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारात स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला आहे.

गत काही दिवसांपासून तालुक्यात नियमित कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत असल्याचे दिसत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात जवळपास १५० रुग्ण संक्रमणीय आढळून आल्याची माहिती आहे. तथापि, स्थानिक लाखांदुरात कोरोना रुग्णांची संख्यादेखील वाढत असल्याने या आजाराचा संभाव्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी येथील नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने शासन निर्देशाचे काटेकोर अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती आहे.

दरम्यान, शासनाच्या ब्रेक द चेन या आदेशानुसार स्थानिक लाखांदुरात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईदेखील केली जाणार आहे.

दरम्यान, ७ एप्रिलला स्थानिक लाखांदूर येथील नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत स्थानिक जनतेला व नागरिकांना कोरोना प्रतिबंधासाठी स्वयंस्फूर्तीने सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार स्थानिक लाखांदूर येथे शासकीय कार्यालये, बँका, औषधी दुकाने, दवाखाने व अत्यावश्यक गरजेची दुकाने वगळता अन्य सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग, दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली.

एकूणच या कडकडीत बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसून, सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

Web Title: Corona tightly closed in the background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.