कोरोना पावला; पहिली ते आठवीपर्यंतचे १.३६ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:37+5:302021-04-06T04:34:37+5:30

भंडारा जिल्ह्यात ७० हजार ६४५ मुलगे, तर ६५ हजार ७६१ मुली असे एकूण १ लाख ३६ हजार ४०६ विद्यार्थी ...

Corona Pavla; 1.36 lakh students from 1st to 8th pass without examination | कोरोना पावला; पहिली ते आठवीपर्यंतचे १.३६ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

कोरोना पावला; पहिली ते आठवीपर्यंतचे १.३६ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

भंडारा जिल्ह्यात ७० हजार ६४५ मुलगे, तर ६५ हजार ७६१ मुली असे एकूण १ लाख ३६ हजार ४०६ विद्यार्थी आहेत. यात इयत्ता १ ते ५ ची विद्यार्थी संख्या ४२ हजार ६९५ असून, इयत्ता ६ ते ८ मध्ये २७ हजार ९५० विद्यार्थी आहेत. याचप्रमाणे इयत्ता १ ते ५वीमध्ये ३९ हजार ५११ विद्यार्थिनी असून, इयत्ता १ ते ८ मध्ये २६ हजार २५० विद्यार्थिनींची संख्या आहे.

अभ्यास न करता पुढच्या वर्गात जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र, कोरोनामुळे आपला पाल्य मागे पडत आहे, याची चिंता पालकांना जास्तच सतावत आहे.

शिक्षणावर परिणाम

यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी ऑनलाईन अभ्यासवर्ग घेण्यात आले. यामध्ये बहुतेक जणांनी सहभाग घेतला, तर काहींकडे माेबाईलची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी अभ्यासवर्गाचा लाभ घेतला नाही. एकवेळ तर विद्यार्थ्यांची परीक्षा हाेणार आहे, असे असताना काेराेनाचा कहर लक्षात घेता शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे शिक्षणावर परिणाम झाला.

Web Title: Corona Pavla; 1.36 lakh students from 1st to 8th pass without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.