कोरोना उद्रेक, डोंगरल्याच्या राऊत कुटुंबीयांनी लेकीचा विवाह केला स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST2021-04-17T04:35:45+5:302021-04-17T04:35:45+5:30

तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील प्रगतशील शेतकरी व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर राऊत यांची लेक प्रियंका हिचा विवाह ...

Corona eruption, Raut family in Dongarla postpones marriage to Leki | कोरोना उद्रेक, डोंगरल्याच्या राऊत कुटुंबीयांनी लेकीचा विवाह केला स्थगित

कोरोना उद्रेक, डोंगरल्याच्या राऊत कुटुंबीयांनी लेकीचा विवाह केला स्थगित

तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील प्रगतशील शेतकरी व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर राऊत यांची लेक प्रियंका हिचा विवाह बालाघाट जिल्ह्यातील रामपायली येथील शांताबाई सुखदेव बनकर यांचा मुलगा उमेश यांच्याशी १६ एप्रिल रोजी डोंगरला येथे होता.

कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या संख्येत वाढल्याने राज्य शासनाने १५ एप्रिलपासून पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी घोषित केले. आपले सामाजिक दायित्व ओळखून समाजातील घटक कोरोना संक्रमित होऊ नये व कोरोना उद्रेकाला थोपविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. समाजासोबत असलेली बांधीलकी ओळखून शंकर राऊत यांनी नियोजित तारखेचा लेक प्रियांकाचा विवाह तूर्तास रद्द केला. कोरोना संपल्यानंतर तो करण्याचा निश्चय केला. या संदर्भात त्यांनी बनकर कुटुंबीयांना कळविले. त्यांनीही राऊत यांना तूर्तास लग्न स्थगितीस होकार दर्शविला.

समाजासमोर एक आदर्श राऊत कुटुंबीयांनी ठेवला आहे. त्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

Web Title: Corona eruption, Raut family in Dongarla postpones marriage to Leki