कोरोना संकटात त्यांनी शोधला जगण्याचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:01:05+5:30

पंचायत समिती माजी सदस्य पुष्पा भुरे यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून खानावळ बंद आहे. दुकाने बंद असल्याने आवक बंद झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा वाढलेला खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाकल्या. पण तरीही त्या हरल्या नाहीत. संकटावर मात करीत त्यानी आपली धडपड चालूच ठेवली.

In the Corona crisis they found a way to survive | कोरोना संकटात त्यांनी शोधला जगण्याचा मार्ग

कोरोना संकटात त्यांनी शोधला जगण्याचा मार्ग

Next
ठळक मुद्देयोद्धांची गाथा : ऑटो चालक, खानावळी आदी व्यवसायिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : कोरोनामुळे अनेकांचे हातचे काम गेले. संचार बंदीचा फटका अनेकांना बसला. यात लहान-मोठे उद्योग बुडाले. शासन व दानशुरांकडून मिळणाऱ्या मदतीच्या भरवश्यावर अनेकांनी आपली वेळ मारून नेली. यात गरजूच्या हक्कावर डल्ला मारणाºया संस्कृतीने कहर केल्याने दानशुराच्या मदतीचा ओघ थंडावला. कोरोनाचे संकट आहे म्हणून अनेकांनी गुडघे टेकलेत. पण या संकटाच्या काळात हातावर हात ठेवून मदतीची अपेक्षा न करता जगण्याचा नवीन मार्ग शोधणाऱ्यांची संख्या कमी नाही.
पंचायत समिती माजी सदस्य पुष्पा भुरे यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून खानावळ बंद आहे. दुकाने बंद असल्याने आवक बंद झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा वाढलेला खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाकल्या. पण तरीही त्या हरल्या नाहीत. संकटावर मात करीत त्यानी आपली धडपड चालूच ठेवली. कोरोना संकटात त्यांनी आपला जगण्याचा नवा मार्ग शोधला. त्यांनी भाजीपाला विक्रीचा पर्याय निवडला. दोन महिन्यांपासून भर उन्हात त्या भाजीपाला विकून आपला प्रपंच चालवत आहेत.
गुरुदेव बोंद्रे, रज्जाक शेख, विजय मेश्राम, शाबीर शेख ऑटो चालक आहेत. लॉकडाऊनने ऑटो चालकांवर उपासमार आली आहे. संचारबंदीच्या नियमात प्रवाशी ऑटो रिक्षा चालवणे परवडेनासे झाले. अनेकांना ऑटोरिक्षाचे कर्ज फेडणहीे मुश्किल झाले. संकटात त्यांनी आपल्या जगण्याचा मार्ग शोधण्यासाठी भाजीपाला व फळे विक्री व भाजीपाला वाहतूक करून स्वत:च्या कुटुंबाचा गाडा चालवत आहेत.
शोभा पचारे यांचे रेल्वे स्थानकसमोर चहा नाश्त्याची दुकान आहे. संचार बंदीत आवक शून्यावर आली. त्यांच्या व्यवसायावर कुटुंब चालते. गणेश देवगडे हे गावोगावी जाऊन सौदर्यप्रसाधनाचे व्यावसायिक होते.
परसराम गिºहेपुंजे व राजू निनावे घर बांधकाम मजूर आहेत. त्या बरोबर राजू कुंभरे यांचे रेल्वे सथानकावर कँटीन होती. या सर्वानी कोरोनाच्या लढाईतही अव्वल स्थान पटकावले. मदतीची आस न धरता त्यांनी आपल्या जगण्याचा मार्ग निवडला.

Web Title: In the Corona crisis they found a way to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.