कोरोनामुळे फळांच्या दरामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST2021-05-17T04:33:45+5:302021-05-17T04:33:45+5:30

कोरोनामुळे नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधाेपचारापेक्षा फळांचा आहार महत्त्वाचा आहे. यामध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, किवी, नारळपाणी, टरबूज, खरबूज ...

Corona causes an increase in fruit rates | कोरोनामुळे फळांच्या दरामध्ये वाढ

कोरोनामुळे फळांच्या दरामध्ये वाढ

कोरोनामुळे नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधाेपचारापेक्षा फळांचा आहार महत्त्वाचा आहे. यामध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, किवी, नारळपाणी, टरबूज, खरबूज यांसह आंबा ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. याचा दररोजच्या आहारात उपयोग केला तर रोग प्रतिकार शक्ती कायम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याबाबतचे सूत्र डाॅक्टरांना कधीचेच समजले आहे. यामुळे डाॅक्टर मंडळी फळे आणि व्यायामावर अधिक लक्ष केंद्रित करतात. सर्वसामान्य नागरिक त्यापेक्षा चमचमीत पदार्थांवर आणि मसालेदार पदार्थांवर खर्च करतात. यातून रोगालाच निमंत्रण दिले जाते. तेलकट पदार्थांनी चरबी आणि बीपीसारखे आजारही वाढतात. आहार हा खनिज पुरविणारा मुख्य स्रोत आहे. तो थेट शरीराला फळाच्या रूपात उपलब्ध होतो. प्रत्येक सिझनमध्ये विविध फळे बाजारात येतात. संचारबंदीमुळे ग्राहकांची लूट केली जात आहे.

Web Title: Corona causes an increase in fruit rates