कोरोना: स्थानिक विकास निधीतून ५० लाखांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:31+5:30

परिस्थितीशी सामना करीत सतत सेवा प्रदान करत आहे. अशा संकटाच्या वेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके यांनी त्यांच्या गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपयांचे अनुदान दिले. यांना त्वरित मान्यता देण्याचे जाहीर केले आहे व निर्देश दिले आहेत.

Corona: Announcement of 50 lakh from Local Development Fund | कोरोना: स्थानिक विकास निधीतून ५० लाखांची घोषणा

कोरोना: स्थानिक विकास निधीतून ५० लाखांची घोषणा

ठळक मुद्देपरिणय फुके : विविध अत्यावश्यक किट खरेदी करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जागतिक आपत्ती म्हणून केंद्र व राज्य सरकार संपूर्ण भारत, त्याच जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनासह संपूर्ण राज्यात, जीवघेणा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजनांतर्गत कार्य करीत आहेत. परिस्थितीशी सामना करीत सतत सेवा प्रदान करत आहे. अशा संकटाच्या वेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके यांनी त्यांच्या गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपयांचे अनुदान दिले. यांना त्वरित मान्यता देण्याचे जाहीर केले आहे व निर्देश दिले आहेत.
आमदार डॉ. फुके यांनी कळविले की, सदर निधीतून जिल्ह्यातील कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी भंडारा व गोंदिया येथील जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना केली आहे.
यात प्रत्येक जिल्हा पातळीवर पर्सनल प्रोटेक्टिव किट, एन-९५ फेस मास्क, ट्रिपल लेअर फेस मॉस्क, हँड ग्लोव्हज, आयसीयू व्हेंटिलेटर, थर्मल इमेजिंग स्कॅनर व कॅमेरे, ‘इन्फ्रा रेड थमार्मीटर‘ इत्यादींच्या पूर्ततेसाठी लवकर मान्यता देण्यात यावी, असे सांगितले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे २७ मार्च रोजी आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा, गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मास्क व जंतुनाशक सेनिटायझर खरेदीसाठी दहा-दहा लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीच्या अनुदान कोरोना बाबत नियंत्रकातील प्रभावी उपाय म्हणून मान्यता दिली होती.
त्या निधिमध्ये वाढ करुन ५० लक्ष केली आहे. डॉ. फुके या आपत्तीत दोन्ही जिल्ह्यांवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Corona: Announcement of 50 lakh from Local Development Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.