पीककर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:59+5:302021-04-01T04:35:59+5:30
सायंकाळी सहा ते सातपर्यंत व सकाळी अगदी नऊ वाजल्यापासून शेतकरी बांधव पीक कर्ज भरण्याकरिता उत्साहीत दिसले. स्वतःकडे पीक ...

पीककर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे सहकार्य
सायंकाळी सहा ते सातपर्यंत व सकाळी अगदी नऊ वाजल्यापासून शेतकरी बांधव पीक कर्ज भरण्याकरिता उत्साहीत दिसले. स्वतःकडे पीक कर्जाची रक्कम उपलब्ध नसतानाही इतरत्र कुठून तरी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करून नियमित प्रोत्साहीत शेतकरी हा सन्मान टिकविण्यासाठी शेतकरी बांधव पीककर्ज भरण्याकरिता तत्पर दिसत आहेत.
शासनाने कोरोना संकटाचे कारण पुढे करीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहीत निधीपासून लांब ठेवले. गतवर्षीच्या नियमाने बोनससुद्धा दिला नाही. हंगामही अपेक्षित झाला नाही. अशा संकटसमयी देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार ठरलेल्या बळीराजाने उधार उसनवार करीत अगदी शेवटच्या टोकापर्यंत पीक कर्जाची रक्कम भरण्याकरिता पुरेपूर प्रयत्न केला. या प्रयत्नात ८५ टक्के शेतकरी बांधव सहभागी झाले. उर्वरित शेतकऱ्यांना मात्र आधार शोधून मिळालाच नाही.