पिंपळगावात वनहक्क परिषदेचा समारोप
By Admin | Updated: May 10, 2015 00:52 IST2015-05-10T00:52:55+5:302015-05-10T00:52:55+5:30
विदर्भ वन अभियान व मानवी हक्क संघर्ष समिती भंडारा यांचे वतीने पिंपळगाव (माडगी) येथे वन हक्क परिषद घेण्यात आली.

पिंपळगावात वनहक्क परिषदेचा समारोप
लाखनी : विदर्भ वन अभियान व मानवी हक्क संघर्ष समिती भंडारा यांचे वतीने पिंपळगाव (माडगी) येथे वन हक्क परिषद घेण्यात आली.
परिषदेचे अध्यक्ष चिंतामण कुंभारे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यावरण मित्र संस्था चेहपुरचे विजय देठे हे होते. विजय देठे म्हणाले, जंगलातील नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धन करण्याचे कायदेशीर अधिकारी मिळवायला हवा.
आर्थिक विकास करण्यासाठी लोकांनी सामुहिक पुढाकार घेऊन अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ हया कायदयातील कलम ३(१) नुसार जास्तीत जास्त गावांनी सामुहिक वन हक्काचे दावे सादर करावे. गावांनी सादर केलेले दावे निकाली काढण्यासाठी संगठीत होऊन लोकांनी पुढकार घेण्यासाठी आवाहनही यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी प्रमोद वालदे, अल्का माटे, रत्नमाला वैद्य, मनीष राजनकर, सचिन पिपरे, मालती सगणे यांनी उपस्थित नागरिकांना यथोचित मार्गदर्शन केले.
तसेच वनहक्क परिषदेमध्ये ग्राम कमकाझरी, येटेवाही, शेगाव, माडगी, पिंपळगाव, खुटसावरी, सायगाव, पेंढरी, गराडा, दैत्मांगली, चीखलाबोडी, सोनेखारी, टेकेपार, पिलांद्री, उमरी असे १५ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हयातल लेखा/मेंढा, चंद्रपूर जिल्हयातील गावांचे दावे मान्य होतात मात्र भंडारा व इतर जिल्हयातील वेगळा कायदा आहे काय? अस सूर परिषदेतून व्यक्त करण्यात आला.
त्यामध्ये परिषदेत ज्या गावांनी सामुहिक वनहक्क दावे सादर केले नाहीत, त्या गावाचे सामुहिक वनहक्क दावे सादर करणे, तसेच ज्या गावांनी सामुहिक वनहक्क दावे सादर केले आहेत या गावाचे दावे मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा असे सांगितले. वेळप्रसंगी आंदोलन करण्याची तयारी ठेवावी, असा निर्णयही या वनहक्क परिषदेत घेण्यात आला. वनहक्क परिषदेचे संचालन नवनाथ उईके व आभार प्रदर्शन संदीप गेडेकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मानवी हक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते अनिल खोब्रागडे, कल्ल्यानी बास्के, अरुण देशमुख व विदर्भ वनहक्क अभियानातील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)