कोंढा जिल्हा परिषद गटाच्या निकालाचा वाद न्यायालयात
By Admin | Updated: August 5, 2015 00:51 IST2015-08-05T00:51:13+5:302015-08-05T00:51:13+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीत कोंढा क्षेत्रातील मतमोजणीत २१० मतांचा घोळ करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ...

कोंढा जिल्हा परिषद गटाच्या निकालाचा वाद न्यायालयात
मतांचा घोळ : राज्य निवडणूक आयुक्ताकडे तक्रार
कोंढा (कोसरा) : जिल्हा परिषद निवडणुकीत कोंढा क्षेत्रातील मतमोजणीत २१० मतांचा घोळ करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी गंगाधर जिभकाटे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पवनी तालुक्यातील कोंढा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत राकाँचे विवेकानंद कुर्झेकर यांनी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांचा ४२ मतानी पराभव केला. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी एच.ए. गवळी होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार एन.जी. राचेलवार हे होते. कोंढा जिल्हा परिषद गणाची मतमोजणीनंतर जोडपत्र-३ तयार केले. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या मताचा हिशेब होता. हस्तलिखित व संगणकाच्या प्रतीमध्ये मोठी तफावत असल्याचे अनेक उमेदवारांच्या लक्षात आले. मतदान केंद्र क्रमांक ७ आकोट येथील मतदान यंत्रात ६१३ मतदान झाले. त्यानुसार होमराज उपरीकर २२, विजय काटेखाये ४०, विवेकानंद कुर्झेकर १७२, गंगाधर जिभकाटे ११५, धनराज जिभकाटे १९७, आशिष माटे ६१ आणि नोटा ०६ मते मिळाली. याची प्रत काढताना जोडपत्र ३ मध्ये धनराज जिभकाटे यांना मिळालेले १९७ मते जोडपत्रात दाखविले नव्हते.
त्यानंतरच्या प्रपत्रात दाखविल्याचे समजते. कोसरा मतदान केंद्र क्रमांक १४ येथे मतदान यंत्रात ७०९ मते नोंदविले असे नमूद व्हीएम भाग ३ मध्ये मतदान केंद्राध्यक्षानी दिलेल्या प्रपत्रात असताना मतदान मोजणीवेळी जोडपत्र ३ मध्ये ७०१ मते दाखविले त्यामध्ये ८ मताचा फरक पडतो आहे. हे ८ मतदानाचा हिशेब अजुनपर्यंत मिळाला नाही.
कोंढा पंचायत समिती गण ८४ मतदान केंद्र क्रमांक १४ कोसरा येथे जोडपत्र ३ मध्ये ६९६ मते झाल्याचे दाखविले आहे. भंडारा जिल्हा परिषद व पवनी पंचायत समितीची निवडणूक एकत्र झाली तेव्हा जिल्हा परिषदला ७०१ मतदानाचा हिशेब दाखविले तर पंचायत समितीसाठी ६९६ मतदानाचे जोडपत्र ३ मध्ये दाखविण्यात आले आहे.
मतदान केंद्र क्रमांक १४ कोसरा येथे मतदान केंद्राध्याक्षाच्या नमुणा व्हीएम ३ नुसार ७०९ मतदान झाले तर १३ मताचा फरक मतमोजणीत कसा झाला याचा खुलासा होणे आवश्यक होते.
निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी गवळी यांच्या या चुका लक्षात आणून दाखविण्यात आले परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जिभकाटे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी एच.ए. गवळी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद होता. (वार्ताहर)