'कुबेर'च्या दरबारात 'ठेके'दारांचा ताफा

By Admin | Updated: March 29, 2015 00:54 IST2015-03-29T00:54:54+5:302015-03-29T00:54:54+5:30

अंगावर पांढरे शुभ्र कपडे... खांद्यावर शुभ्र किंवा भगवा दुप्पटा... हातात महागडे मोबाईल व डोळ्यावर काळा गॉगल लावलेले...

The contractor's cushion in Kuber's courtroom | 'कुबेर'च्या दरबारात 'ठेके'दारांचा ताफा

'कुबेर'च्या दरबारात 'ठेके'दारांचा ताफा

प्रशांत देसाई भंडारा
अंगावर पांढरे शुभ्र कपडे... खांद्यावर शुभ्र किंवा भगवा दुप्पटा... हातात महागडे मोबाईल व डोळ्यावर काळा गॉगल लावलेले... रूबाबदार व्यक्ती महागड्या गाडीतून उतरताच परिसरातील सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. पेहराव्यावरून 'ते' मोठे राजकारणी वाटतात. मात्र, ते राजकारणी नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे 'वजनदार' ठेकेदार असल्याने वाताणुकुलीन गाड्यांचा धुराळा उडवीत कार्यालयात येतात.
एखाद्या चित्रपटातील अभिनेत्याला लाजवेल अशा रूपाब व पेहरावात येणारे हे व्यक्तीमत्व दुसरे तिसरे कोणी नसुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आहेत. भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागील परिसरात आहे. स्वतंत्र इमारतीत असलेल्या या कार्यालयातून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांचे बांधकाम करण्यात येते. कार्यालयाच्या अधिनस्थ अनेक छोटे-मोठे ठेकेदार आहेत. यातील काही शासकीय मान्यताप्राप्त तर काही कमीशनवर काम करणारे ठेकेदार आहेत. ठेकेदारी व्यवसायातून अनेकांनी स्वत:ची समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेकांकडे महागड्या गाड्या आहेत. हे सर्व त्यांनी स्वत:च्या बुध्दीचातूर्यातून कमावले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मार्च महिन्याचा शेवट सुरू आहे. वित्तीय वर्षाचे शेवटचे दिवस शिल्लक असल्याने वर्षभर केलेल्या बांधकामाचे थांबलेले देयक मिळावे, यासाठी सध्या हे ठेकेदार बांधकाम विभागाच्या कार्यालयात घिरट्या घालीत आहेत. कार्यकारी अभियंता हे या विभागाचे सर्वेवर्वा आहेत. जिल्ह्यातील या विभागाकडे धनलक्ष्मी असल्याने एकप्रकारे 'कुबेर' राजाची उपमा त्यांना याच ठेकेदारांनी दिली आहे. त्यांच्याकडील रखडलेल्या फाईलची देयक मिळावे, यासाठी हे ठेकेदार साकडे घालीत आहेत. वेळप्रसंगी एखाद्या ठेकेदाराला विचारल्यास सार्वजनिक बांधकाम विभागात असल्याचे न सांगता 'कुबेर' राजाच्या दरबारात असल्याचे सांगतो. त्यामुळे आता या विभागाला कुबेरनगरी असे सांबोधल्या जात आहे.
वर्षभर किंवा काही दिवसापूर्वी केलेल्या कामांचे देयक मिळावे, यासाठी हे ठेकेदार रखडलेली 'फाईल' साहेबांच्या टेबलवर ठेवण्यासाठी वेळप्रसंगी कर्मचाऱ्यांना प्रलोभण देतात. कार्यालयाच्या दालनात, कोणत्याही व्यक्तीने कार्यालयीन कर्मचाऱ्याजवळ कामाव्यतीरिक्त बसू नये, असे स्पष्ट नमूद असलेला फलक लावलेला आहे. असे असतानाही यातील काही ठेकेदार हे तासण्तास या कार्यालयात लेखा विभागात बसून दिसतात. वर्षभर काळेपिवळे करणाऱ्यांचे देयक आता 'मार्च एंडिंग'च्या सपाट्यात कमिशनच्या बदल्यात काढण्यात येईल, असे ठेकेदारच आता दबक्या आवाजात बोलू लागले आहे.
एरवी शासकीय सुट्टीच्या दिवशी हमखास बंद राहत असलेला हा विभाग, आता मार्च एंडिंगच्या नावावर सुरू राहतो. एवढेच नाहीतर रात्री उशिरापर्यंत येथे काम चालते. वर्षभर न होणारे काम, केवळ मार्च एंडिंगच्या नावावर दिवसरात्र मेहनत करून येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी करताना दिसून येत आहेत. यावर त्यांच्या कर्तव्यदक्षतेवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करून नये, हाच त्यांचा मुळ उद्देश असल्याचे यावरून दिसून येते.

Web Title: The contractor's cushion in Kuber's courtroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.