शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

कंत्राटी डॉक्टर ९ महिन्यांपासून वेतनापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 1:35 PM

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ढासळली : वैद्यकीय अधिकाऱ्यावर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना तब्बल ९ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. परिणामी या वैद्यकीय अधिकाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आली की काय असे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नोकरी करणे पसंद करीत नाही.

परिणामी त्या डॉक्टरांचा सेवा काळ संपताच ते नोकरीचा राजीनामा देऊन मोकळे होतात. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणाचे तीन तेरा वाजतात. परिणामीराज्य शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या कालावधीकरिता बीएएमएस डॉक्टरची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद भंडाराने सप्टेंबर २०२३ ला कंत्राटी पद्धतीने भरती करून जिल्ह्यात नियुक्त केले.

मात्र नियुक्तीपासून ते आजपर्यंतचे वेतन (मानधन) या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळालेले नाही. एकूणच बिन पगारी फुल अधिकारी अशीकाहीशी स्थिती या वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाली आहे.

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे २४ तास प्राथमिक आरोग्य केंद्रावर सेवा देत आहेत. पण पगार मागण्यासाठीसुद्धा त्यांना जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना फोनवर फोन करावे लागत आहेत.

समोरून फक्त आश्वासन देण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

निधीचा तुटवडा असल्याने त्यांना वेतन मिळाले नाही. मात्र आता निधी आल्याने सोमवारला त्यांच्या खात्यात वेतन जमा केले जाणार आहे.- रवींद्र राठोड, प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा. 

 

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्यGovernmentसरकारMONEYपैसा