शिक्षक-विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत सातत्य ठेवावी

By Admin | Updated: December 17, 2015 00:44 IST2015-12-17T00:44:37+5:302015-12-17T00:44:37+5:30

शाळेची प्रगती ही शिक्षक-विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. त्यासाठी शिक्षकाने अप्रगत विद्यार्थ्याकडे बारकाईने नजर ठेवून, त्याला गुणवत्ताचे रंगाने आणावे.

Continuity of teacher-student quality | शिक्षक-विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत सातत्य ठेवावी

शिक्षक-विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत सातत्य ठेवावी

खरबी नाका येथे स्रेहसंमेलनाचा समारोप : उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : शाळेची प्रगती ही शिक्षक-विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. त्यासाठी शिक्षकाने अप्रगत विद्यार्थ्याकडे बारकाईने नजर ठेवून, त्याला गुणवत्ताचे रंगाने आणावे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आपली व शाळेची गुणवत्ता अबाधीत ठेवावी. यासाठी शिक्षक-विद्यार्थ्यांनी गुणवत्तामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी केले.
विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खरबी नाका येथील वार्षिक स्रेहस्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार बोलत होते.
यावेळी जे.एम. पटेल कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा. सुमंत देशपांडे, चेतन भैरम, प्रा. डफरे, संस्था सचिव श्रीहरी जौजाळ, मनोहर घाटोळे, युवराज घाटोळे, उद्दल आकरे, विनोदराव बावनकर, अर्चना बावनकर, मीरा धावडे, प्राचार्य वसंत कोरेमोरे, पर्यवेक्षक डी.के. हटवार, काजल आकरे, सागर मोथुरकर, रेश्मा वाडीभस्मे उपस्थित होते. प्रा. सुमंत देशपांडे म्हणाले की, अपयशी विद्यार्थ्यांनी खचून जाऊन नये. अपयशामागे यश असतो. वैज्ञानिक काळातील स्पर्धा परीक्षामध्ये नियमित भाग घ्या. गीता ही आचरणीय आहे. गिताचे मर्म जाणून घ्या. यावर बोलणारे खुप आहे. मात्र यातील गुण भावर्थ समजावून व अंगीकारणे बोटावर मोजण्याईतके मिळतील. संधी शोधण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र नागरे म्हणाले, रस्ता सुरक्षाचे पालन करून विद्यार्थ्यांनी वाहन चालविताना आपले आई वडील भाऊ बहीण आहे याची जान ठेवून वाहन चालवावे, वेसनाधीन राहु नये. यातच आपल्या आरोग्य सुखरूप राईल.
याप्रसंगी हस्तकला, चित्रकला, रांगोळी, कबड्डी, लंगडी, दौड, दोरीवरील उड्या, चमचा गोळी, गीत गायन, वकृत्व व सांस्कृतीक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना समान पत्र व बक्षीस उपस्थित पाहुण्याच्या हस्ते देण्यात आले. तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी आनंद मेळावा जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी पंचायत सतिमीचे सदस्य राजेश मेश्राम, उद्दल आकरे, श्रीहरी जौंजळ उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावून खरी कमाई यासह शालेय उपक्रमाची परिचित करून दिली. प्रास्ताविक प्राचार्य वसंत कारेमोरे यांनी केले. संचालन चंद्रशेखर गिरडे यांनी केले. आभार सुभाष वाडीभस्मे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हायस्कूलचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी संस्था पदाधिकारी सदस्य गावकरी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Continuity of teacher-student quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.