विहिरीत दूषित पाण्याचा शिरकाव

By Admin | Updated: July 21, 2014 23:43 IST2014-07-21T23:43:22+5:302014-07-21T23:43:22+5:30

महामार्ग लगत बुद्ध विहार ठाणा पेट्रोलपंप जवळील सार्वजनिक विहिरीत दुषित पाण्याचा शिरकाव होत आहे. हे दुषित पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या नालीचे की, नळ पाणीपुरवठा पाईप लाईनचे हा

Contaminated water in the well | विहिरीत दूषित पाण्याचा शिरकाव

विहिरीत दूषित पाण्याचा शिरकाव

ठाणा येथील प्रकार : पाणी नळाचे की नाल्याचे?, नागरिकांमध्ये संम्रम
जवाहरनगर : महामार्ग लगत बुद्ध विहार ठाणा पेट्रोलपंप जवळील सार्वजनिक विहिरीत दुषित पाण्याचा शिरकाव होत आहे. हे दुषित पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या नालीचे की, नळ पाणीपुरवठा पाईप लाईनचे हा संभ्रम निर्माण झालेला आहे. परिणामी पिण्याची पाणी दुषित झाल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले. यात गावांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य व वितरण जलवाहिनीचे नवीन ठिकाणी स्थानांतरण करण्यात आले. या अनुषंघाने जुना बुद्ध विहार ठाणा पेट्रोेलपंप लगत मुख्य व वितरण जलवाहिनी स्थानांतरीत करण्यात आले. तर राष्ट्रीय महामार्गाचे पाणी वाहून जाण्याकरिता मुख्य सिमेंट काँक्रीटचे नाल्या तयार करण्यात आले.
मात्र या नाल्यांमध्ये आधिच घनकचरा व कामाकरिता वापरलेली गिट्टी, रेती, सिमेंट स्लीपरचे ठिग पडून आहेत.
परिणामी पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झालेला आहे मुख्य जलवाहिनी व नाली या दरम्यान जुना बुद्ध विहार जवळील विहिरीत लालसर मातीमिश्रीत दुषित पाण्याचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी ग्रामस्थाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंबंधी ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाला विचारणा केली असता मुख्य स्त्रोतामधील मोटार जळाल्यामुळे दोन दिवसापासून पाणी येणे बंद आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काल पाणी आलेला नाही. आज पाणी आलाय. ते ही कमी प्रमाणात. दुसरीकडे पाहता महामार्ग मुख्य नालीमध्ये पाणी साचेल ऐवढे पाऊस पडलेले नाही. या कडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Contaminated water in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.