कोंढा येथे दूषित पाणी पुरवठा
By Admin | Updated: November 9, 2014 22:28 IST2014-11-09T22:28:12+5:302014-11-09T22:28:12+5:30
कोंढा येथे वॉर्ड क्र. ३ मध्ये हँडपंपला दुषित पाणी तीन महिन्यापासून येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोंढा येथे दूषित पाणी पुरवठा
कोंढा कोसरा : कोंढा येथे वॉर्ड क्र. ३ मध्ये हँडपंपला दुषित पाणी तीन महिन्यापासून येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोंढा ग्रा.पं. ने गावात पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी हँडपंप, नळयोजना तयार केली. पण सध्या भारनियमनामुळे वॉर्ड क्र. ३ मध्ये दोन, तीन दिवस नळ येत नाही. अशावेळी पिण्याच्या पाण्यासाठी हँडपंपवर नागरिकांना अवलंबून राहावे लागते. तीन महिन्यांपासून हँडपंपाला गढूळ, लालसर, खराब, दुषित पाणी येत आहे. याची तक्रार ग्रा.पं. कार्यालयास दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. असे वॉर्डातील नागरिकांचे म्हणणे आहे.
सुभाष वॉर्ड क्र. ३ मध्ये ४ हँडपंप आहेत. त्यापैकी १ नादुरुस्त असून रामनाथ सेलोकर यांच्या घराजवळील हँडपंपवर पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड गर्दी असते. दुषित पाणी पिल्याने नागरिकांना अतिसार कावीळ, गळ्याचे आजार बळावण्याची शक्यता आहे. सुभाष वॉर्ड क्र. ३ चे सदस्य उपसरपंच गौतम टेंभुर्णे, मनिषा लिचडे, ज्ञानदेव कुर्झेकर हे आहेत. त्यांना अनेकदा दुषित पाणी येत असल्याचे सांगितले. पण त्यांचे दुर्लक्ष होत आहे. कोंढा येथीलनागरिकांनी सरपंचशिला कुर्झेकर व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुर्झेकर यांना देखील या संबंधात माहिती दिली. नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने इतर वॉर्डातून दूर अंतरावरून डोक्यावर घागरीने पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या संबंधात सरपंच शिला कुर्झेकर यांना विचारले असता वॉर्ड क्र. ३ मधील नागरिकांची तक्रार प्राप्त होताच आठ दिवसापूर्वी जि.प. भंडारा येथे ग्राम विकास अधिकारी यांच्यातर्फे पत्र पाठविले आहे. तसेच पं.स. पवनी येथे देखील पत्र देवून दुरुस्ती करण्यासंबंधी कारवाई लवकरच होईल असे सांगितले. सुभाष वॉर्ड क्र. ३ मधील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी हँडपंप दुरुस्त करून शुद्ध पिण्याचे पाणी न मिळाल्यास ग्रा.पं. कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे कैलाश वंजारी, विठ्ठल जांभुळकर, विलास मोहरकर, सुनिल माकडे, नाना लिचडे, गांधी तलमले, मोतीलाल जांभुळकर, रोशन कुर्झेकर, दिनेश खंडाते, मंगला जांभुळकर, शिल्पा वंजारी, वैशाली सेलोकर, मंगला सेलोकर व स्त्री पुरुषांनी लेखी तक्रारीद्वारे केली आहे. या संबंधी आरोग्य विभागाला देखील तक्रार केली आहे. (वार्ताहर)