कंटेनरच्या धडकेत ट्रक उलटला

By Admin | Updated: June 12, 2016 00:15 IST2016-06-12T00:15:31+5:302016-06-12T00:15:31+5:30

राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरने विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली.

Container pushing the truck back | कंटेनरच्या धडकेत ट्रक उलटला

कंटेनरच्या धडकेत ट्रक उलटला

विश्रामगृहासमोरील घटना : चालक कंटेनरसह पळाला
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरने विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली. यात १२ चाकांचा ट्रक उलटला. ही घटना शनिवारच्या मध्यरात्री विश्रामगृहासमोर घडली.
शनिवारच्या मध्यरात्री १.४० वाजता राजस्थानहून रायपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक आर.एस.२० / जी.ए. ५६५४ ला विरूद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक लागली. त्यात वाहनचालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक रस्त्यालगतच्या वीज खांबाला धडकला. यात वीज खांब तुटून ट्रक रस्त्याच्या बाजुला उलटला. यात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. याबाबत ट्रकचालक देवीशंकर रा.कोटा राजस्थान म्हणाला, भरधाव कंटेनर चालकाने ट्रकला कट मारण्याच्या प्रयत्नात धडक दिली. यात ट्रकमधील २० टन लसून रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले. त्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार ही घटना रात्रीची असल्यामुळे अनर्थ टळला. ही घटना दिवसा घडली असती तर मोठी हानी झाली असती. या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे या मार्गावर नागरिकांची नेहमी वर्दळ असते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Container pushing the truck back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.