ग्राहकांचे हित सर्वतोपरी

By Admin | Updated: August 27, 2015 00:56 IST2015-08-27T00:56:05+5:302015-08-27T00:56:05+5:30

सहकार क्षेत्र हे सहकार्यावर चालणारी सिस्टिम आहे. कोणत्याही बँकेची प्रगती ही त्यांच्या ग्राहकांच्या समाधानावर अवलंबून आहे.

Consumers' best interests | ग्राहकांचे हित सर्वतोपरी

ग्राहकांचे हित सर्वतोपरी

ग्राहक मेळावा : उद्धव डोरले यांचे प्रतिपादन
वरठी : सहकार क्षेत्र हे सहकार्यावर चालणारी सिस्टिम आहे. कोणत्याही बँकेची प्रगती ही त्यांच्या ग्राहकांच्या समाधानावर अवलंबून आहे. बँकेचे हित लक्षात ठेवून कर्मचारी व ग्राहकांचे संबंध यावर लक्ष केंद्रित करून कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांचे आर्थिक सुरक्षा लक्षात ठेवून बँकेची प्रगती साध्य करू असे प्रतिपादन अर्बन बँक वरठीचे पालक संचालक उद्धव डोरले यांनी केले.
अर्बन बँकेचे संचालन व माजी राज्य मंत्री नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या अध्यक्षेत ग्राहक मेळावा व पालक संचालक सुत्र ग्रहण सोहळा घेण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून संचालक हेमंत महाकाळकर, चिंतामण मेहर, पांडूरंग खाटीक उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे उपस्थित होते.
यावेळी वामन थोटे, अरविंद येळणे, गंगाधर पंचभाई, नितीन भाजीपाले, चांगदेव रघुते, दामु माटे, कैलास वैद्य, अशोक येळणे, दयाल बन्सोड उपस्थित होते. संचालन व आभार शाखेचे व्यवस्थापक मेघराज पंचभाई यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Consumers' best interests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.