ग्राहक मंचाची एसबीआय, कॅनरा बँकेला चपराक

By Admin | Updated: January 6, 2015 22:55 IST2015-01-06T22:55:00+5:302015-01-06T22:55:00+5:30

खात्यामधून कपात करण्यात आलेले १० हजार रुपये ग्राहकाला ६ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश ग्राहक मंचने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उत्तर प्रदेशातील गोंडा शाखेला दिले आहे.

Consumer Forum's SBI, Canara Bank Chaparak | ग्राहक मंचाची एसबीआय, कॅनरा बँकेला चपराक

ग्राहक मंचाची एसबीआय, कॅनरा बँकेला चपराक

भंडारा : खात्यामधून कपात करण्यात आलेले १० हजार रुपये ग्राहकाला ६ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश ग्राहक मंचने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उत्तर प्रदेशातील गोंडा शाखेला दिले आहे. कॅनरा बँकेच्या वरठी शाखेने ग्राहकाला सात हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही बजावले आहे.
रामनाथप्रसाद रा.वरठी हे सनफ्लॅग कारखान्यात नोकरीला आहेत. त्यांच्याकडे कॅनरा बँकेचे एटीएम आहे. त्यांनी उत्तरप्रदेशातील गोंडा रेल्वेस्थानकावर ते स्टेट बँकेच्या एटीएममधून पाच हजार रुपये काढण्यासाठी गेले. प्रयत्न करुनही पैसे मिळाले नाही. मात्र, खात्यातून १० हजार रुपये कमी झाल्याचा एसएमएस त्यांना मोबाईलवर आला. त्यामुळे रामनाथप्रसाद यांनी वरठी येथील कॅनरा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शाखाधिकाऱ्यांनी एटीएमचा वापर केलेल्या गोडा येथील स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना तक्रार करण्यासाठी सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडे तक्रार दाखल करून बँकींग लोकपाल यांच्याकडे तक्रार केली. कॅनरा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी रामनाथप्रसाद यांना शिल्लक रकमेचे विवरण पाठविले नाही. बँकींग लोकपालद्वारे झालेल्या चौकशीची माहिती खातेधारकाला दिली नाही. रक्कम देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. मंचाने दोन्ही शाखा अधिकाऱ्यांना नोटीस पाठविली. मात्र गोंडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी उत्तर न देता त्यांच्या एटीएम मशीन व्यवहारासंदर्भात दस्ताऐवज दाखल केले. तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्तावेज, वरठी येथील शाखाधिकाऱ्यांचे लेखी उत्तर तसेच दोन्ही पक्षाच्या वकीलांच्या युक्तीवादानंतर ग्राहक मंचाने गोंडा येथील शाखा अधिकाऱ्यांनी त्यांना १० हजार रुपये शेकडा ६ टक्के दराने व्याजाची आकारणी करून परत करावे, व्याजाची आकारणी १० फेब्रुवारी २०१२ पासून संपूर्ण रक्कम देईपर्यंत परत करावी. असे आदेश दिले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Consumer Forum's SBI, Canara Bank Chaparak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.