ग्राहक मंच होणार ‘फाईलमुक्त’

By Admin | Updated: November 19, 2014 22:33 IST2014-11-19T22:33:42+5:302014-11-19T22:33:42+5:30

ग्राहक चळवळ ही काळाची गरज आहे. शोषणमुक्त समाजाची उभारणी करण्यासाठी सर्वांची गरज आहे. चळवळीच्या व्याप्तीसाठी शाळा व महाविद्यालयातून उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Consumer Forum will be free of 'File-free' | ग्राहक मंच होणार ‘फाईलमुक्त’

ग्राहक मंच होणार ‘फाईलमुक्त’

अपंगांच्या तक्रारींना प्राधान्य : पत्रपरिषदेत सूर्यकांत गवळी यांची माहिती
भंडारा : ग्राहक चळवळ ही काळाची गरज आहे. शोषणमुक्त समाजाची उभारणी करण्यासाठी सर्वांची गरज आहे. चळवळीच्या व्याप्तीसाठी शाळा व महाविद्यालयातून उपक्रम राबविण्यात येणार आहे. आधुनिकतेसोबतच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचचे कामकाज पारदर्शक व्हावे यासाठी इंटरनेटचा वापर करून ‘फाईलमुक्ती’साठी प्रयत्न असून ग्राहकांची तक्रार अथवा पत्रव्यवहार भविष्यात ई-मेलने करण्याचा प्रयत्न असून अपंगांच्या तक्रारींना प्राधान्य देणार असल्याची माहिती ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी दिली.
ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते भंडारा येथे आले असता त्यांनी आज बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, पुरवठा निरीक्षक विजय सहारे हे उपस्थित होते. माहिती देताना गवळी यांनी, ग्राहक चळवळ ही कोणत्याही व्यक्ती, धर्म वा व्यापाऱ्यांविरूध्द नसुन व्यवस्था सुधारणारी चळवळ आहे. व्यापाऱ्यांनी उचीत व्यापार करावा. सविनिय कायदे पालन, सुसंवाद व समन्वयातुन सर्वांच्या कल्याणासाठी ग्राहकाभिमुख शासन उभारण्यासाठी कटीबद्ध आहे.
शासन शक्ती, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, शासन दंडशक्तीतुन शोषणमुक्त समाजाची उभारणी करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सर्व विविध खात्याच्या ठिकाणी, तालुकास्तरावर ग्राहक दिन साजरा करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली करण्यात येणार आहे. ग्राहक चळवळ राबविण्यासाठी शाळा व महाविद्यालयातुन उपक्रम राबविण्यात येणार आहे.
प्रभावी काम करणाऱ्या ला यशवंत ग्राहक राजा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून शासकीय, निमशासकीय कार्यालय, सिनेमागृह, रंगमंच येथे ग्राहक प्रतिज्ञा राबविण्याबाबत शासन दरबारी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Consumer Forum will be free of 'File-free'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.