अनधिकृत रेती घाटांची निर्मिती
By Admin | Updated: March 7, 2016 00:20 IST2016-03-07T00:20:49+5:302016-03-07T00:20:49+5:30
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात असलेल्या वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे पात्रात तीन रेती घाटांना शासनाने लिलावात मंजुरी दिली असली तरी

अनधिकृत रेती घाटांची निर्मिती
३ रेती घाटांचे १० कंत्राटदार : शासकीय यंत्रणा अनभिज्ञ
रंजित चिचखेडे चुल्हाड (सिहोरा)
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात असलेल्या वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे पात्रात तीन रेती घाटांना शासनाने लिलावात मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात दर्जेदार रेती असणारे १० घाट असल्याचे लोकमतच्या शोध मोहीमेत निदर्शनास आले आहे. ही अनधिकृत रेती घाटांची निर्मिती असून छुप्प्या मार्गाने या घाटावरुन रेतीची उपसा सुरु आहे.
सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे खोरे आहे. या नद्यांच्या काठावर गावांचे वास्तव्य असून नदी पात्रात ५९२.४६ हेक्टर आर जागा आहे. एकट्या बपेरा गावाच्या हद्दीत ११२.०४ हेक्टर आर नदीचे पात्र आहे. या पात्रात पाणी नसून दर्जेदार रेती असतांना घाट लिलावात काढण्यात आले नाही. या शिवाय चुल्हाड ८५ हेक्टर, देवरी(देव) ९१ हेक्टर ८८ आर, महालगाव ४७ हेक्टर ६४ आर, ब्राह्मणटोला १ हेक्टर ३५ आर, वारपिंडकेपार २६ हेक्टर ४९ आर, मांडवी ७० हेक्टर ६७ आर, परसवाडा ३१ हेक्टर २१ आर, पिपरी चुन्ही ५२ हेक्टर १७ आर, तर वाहनी १६ हेक्टर ६१ आर असे पात्र नदी पात्रात आहे. मांडवी गावनजिक वैनगंगा नदीवर धरण बांधकाम करण्यात आल्याने पिपरी चुन्ही ते बपेरा या गावापर्यंत नदी पात्रात पाणीच पाणी आहे. यामुळे वैनगंगा नदी काठावरील देवरी (देव), सुकडी (नकुल), पिपरी चुन्ही, चुल्हाड आणि परसवाडा गावाच्या हद्दीतून रेतीचा उपसा करण्यात येत नाही. या शिवाय बपेरा ते नाकाडोंगरी या गावापर्यंत बावनथडी नदीचे पात्र कोरडे असून वैनगंगा नदीवरील पिपरी चुन्ही गाव नजिक धरणाचे उर्ध्व भागातील नदीचे पात्र कोरडे आहे. यामुळे शासनाने तामसवाडी, मांडवी व वारपिंडकेपार रेती घाटांना लिलावात मंजुरी दिली आहे. यापैकी वारपिंडेपार रेती घाटांचा लिलाव करण्यात आला असून उशिरापर्यंत या घाटावर रायल्टी उपलब्ध करण्यात आली नाही. यामुळे गरीब व सामान्य नागरिकांचे घरकुल, शौचालय, खासदार व आमदार निधी अंतर्गत मंजुर कामे, शेतकऱ्याचे विहिरीचे बांधकाम रेती अभावी अडचणीत आली आहे.
वारपिंडकेपार घाटाचे लिलाव झाले असतांना रायल्टी उपलब्ध करण्यात आले नसल्याचे कारणावरुन रेतीची नाईलाजास्तव चोरी सुरु झाली आहे. गरिबांना ट्रकने रेतीची वाहतुक परवडणारी नसल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरने रेतीची वाहतुक परवडणारी नसल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरने चोरट्या रेतीची वाहतुक परवडणारी नसल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरने चोरट्या रेतीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. अधिकार पोलिसांना प्राप्त झाले आहेत. मात्र सर्वांचे चांगभलं होत असल्याने रेती चोरी प्रकरणात फौजदारी कारवाई बोटावर मोजण्या इतपत आहे. घाटांचे लिलाव झाले नसताना कामे २० टक्के पूर्ण होण्याचे मार्गावर आली आहे. यामुळे रेतीची अनधिकृत उपसा सिहोरा परिसरात सुरु आहे. या घाटांची शोध मोहीम लोकमतने राबविली असताना ‘बाप रे बाप, तीन घाटांचे १८ बाप!’ अशी म्हणण्याची वेळी आली आहे. सोंड्या गावालगत बावनथडी नदी पात्रातून मध्य प्रदेशातील चिचोली गावाला जोडण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. या गावात असे दोन अनधिकृत रेतीचे घाट आहेत. या शिवाय वारपिंडकेपार गाव शेजारी घाट लिलाव झाला असतांना अनधिकृत रेतीची घाट तयार करण्यात आला आहे. या घाटावरुन वसुली सरु करण्यात आली आहे. बपेरा, मांडवी, चुल्हाड, तामसवाडी, पांजरा गावाच्या हद्दीत १० अनधिकृत रेती घाटांची निर्मिती करण्यात आली आहे. अनधिकृत निर्मित रेती घाटावर अंकुश नसल्याने, अवैध मार्गाने रेतीची चोरी होणार आहे. यामुळे स्वस्त दरात रेती उपलब्ध करण्याची गरज आहे.