चांदपुरात धरण बांधकाम करा
By Admin | Updated: November 12, 2014 22:39 IST2014-11-12T22:39:32+5:302014-11-12T22:39:32+5:30
सिहोरा परिसरातील सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी विस्तीर्ण चांदपूर जलाशयांच्या पाळीवर धरण बांधकाम मंजुर करण्याची मागणी परिसरातील सरपंच यांनी केली आहे. या आशयाचे पत्र

चांदपुरात धरण बांधकाम करा
सरपंचाचे शासनाला निवेदन : अधिक रेती ओलीताखाली येणार
चुल्हाड (सिहोरा): सिहोरा परिसरातील सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी विस्तीर्ण चांदपूर जलाशयांच्या पाळीवर धरण बांधकाम मंजुर करण्याची मागणी परिसरातील सरपंच यांनी केली आहे. या आशयाचे पत्र राज्य शासनाला पाठविण्यात आले आहे.
सिहोरा परिसरात शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम धरण्याची क्षमता विस्तीर्ण चांदपूर जलाशयात आहे. या जलाशयाचे सिंचित क्षेत्र ७,०२९ हेक्टर आर शेती आहे. पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणात या जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत आहे. यात उजवा कालावा ३,९६९ हेक्टर आर व डावा कालवा ३,०६८ हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यात येत आहे. या प्रकल्पाचे एकूण समावेश क्षेत्र १०,११७ हेक्टर आर शेती आहे. तर सांडण्याचा प्रकार १४,९३८ हेक्टर आर आहे. परंतु नियोजन शुन्यता तथा निधीअभावी हा जलाशय उद्विष्ट गाठत नाही. या जलाशय, पाक आणि चिकार चे बांधकाम ब्रिटीशकालीन आहे. सन १९०७ मध्ये जलाशयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाण्याच्या विसर्ग करणाऱ्या चिकारला १०७ वर्ष पूर्ण झालेली आहे. पाणी वाटप करतांना चिकार धोक्याची घंटा वाजवित आहे. पाणी वाटपात चिकारला कपंन येत आहे. यंदा पाणी वाटप करतांना चिकारचे जिर्ण दरवाजे तुटली आहेत. परिणामी जलाशयातील संपुर्ण पाणी रिकामे धरण्यात आलेली आहेत. यामुळे येत्या उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नाही.
दरम्यान चिकारमधुन पाण्याचा विसर्ग करताना थेट उजवा आणि डावा कालव्याकडे पाण्याचा प्रवाह पडता करण्यात येत नाहीत. आधी टाकीत पाण्याची साठवणुक करण्यात येत आहे. टाकी पाण्याने पुर्ण तुडूंब भरल्यास नंतर कालव्यांना पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग अल्प प्रमाणात होत असल्याने ही प्रक्रिया केली जात आहे. परंतु नविन नियोजन केले जात नाहीत. यामुळे अधिकाधिक क्षेत्र ओलीताखाली आणतांना यंत्रणेला कसरत होत आहे.
परिसरात पाणीच पाणी आहे. चांदपुर जलाशयाच्या सोबतीला सोंडयाटोला उपसासिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे उपसा करण्यात आलेले पाणी जलाशयात साठवणुक करण्यात येते. पावसाळ््यात बावनथडी नदी पात्रातून पाण्याचा उपसा प्रकल्प करित आहे. यामुळे शेतकऱ्यांवर खर्चाचा भार अधिक येत नाही.
परंतु सिंचनाच्या महत्वाकांक्षी सोयी असतांना सिंचित क्षेत्रात वाढ होत नाही. टेलवर पाणी पोहचत नाही अशी बोंबाबोंब पावसाळ््यात शेतकरी करित आहेत. या सकटांतुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. निधी अभावी हा घोळ होत असल्याची माहिती मिळाली आहे.
परिसरात रोजगार नाही, उद्योग, कारखाने शोधुन ही सापडणार नाही, शेती व्यवसायावर अर्थव्यवस्था आहे. धानाचे पिक प्रमुख आहे. जलाशय, तथा नद्यांच्या खोऱ्यात वास्तव्य असतांना शेतकरी सक्षम होत नाही. खरिप आणि रब्बी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तयार असतांना टप्पा - टप्प्याने पाणी वाटप आडवे येत आहे.
संपुर्ण क्षेत्र रब्बी हगांमात ओलीता खाली आणण्यासाठी नियोजन आखण्याची गरज आहे. पाण्याचा वाढता विसर्ग करण्यासाठी जलाशयाच्या पाळीवर धरण बांधकाम मंजुर करण्याची मागणी धनेगावचे सरपंच छगनलाल पारधी, वाहनीचे सरपंच राजेंद्र ढबाले, मोहाडी (खापाचे) माजी सरपंच अंबादास कानतोडे, चुल्हाडचे माजी सरपंच भास्कर सोनवाने, सतिष पटले, युवराज हुड, देवेंद्र चिंचखेडे, सुनिल मेश्राम, तामसवाडीचे उपसरपंच अनिल वासनिक, भाजपचे महामंत्री बंडू बनकर, किशोर राहांगडाले, टेमनीचे सतिष चौधरी, धनेंद्र तुरकर, बळीराम बघारे, पंढरी गौतम, माजी प.स.सदस्य बंडु चौरीवार, बपेराचे सरपंच साधना वालदे, दावेझरीच्या सरपंच गायत्री चौरागडे, तथा १० गावातील सरपंचांनी केली आहे. (वार्ताहर)