१३ कोटींच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST2021-08-26T04:37:16+5:302021-08-26T04:37:16+5:30

पंचायत समिती कार्यालय वगळता इतर शासकीय कार्यालये एकाच प्रशासकीय इमारतीत राहावीत याकरिता तहसील कार्यालय परिसरात १३ कोटींच्या प्रशासकीय इमारतीला ...

Construction of 13 crore administrative building at a slow pace | १३ कोटींच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम संथ गतीने

१३ कोटींच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम संथ गतीने

पंचायत समिती कार्यालय वगळता इतर शासकीय कार्यालये एकाच प्रशासकीय इमारतीत राहावीत याकरिता तहसील कार्यालय परिसरात १३ कोटींच्या प्रशासकीय इमारतीला मंजुरी देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु अद्यापही या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसून ते संथ गतीने सुरू आहे.

अनेक विभागांतील प्रशासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत त्यामुळे नागरिकांना काम सोडून दुसऱ्या स्थळापर्यंत जावे लागते. यात नागरिकांचा वेळ अधिक खर्च होऊन मानसिक त्राससुद्धा सहन करावा लागतो. त्यामुळे एकाच इमारतीत सर्व प्रशासकीय कार्यालये सुरू व्हावीत, अशी संकल्पना राज्य शासनाची होती. त्या अनुषंगाने तुमसर येथे १३ कोटींच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे दरवर्षी भाड्यापोटी लाखो रुपयांची शासनाची बचत होईल.

बॉक्स

तहसील कार्यालयाला गळती

मागील दोन वर्षांपासून इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. बांधकामाची गती वाढविण्याची गरज आहे. तुमसर तहसील कार्यालयाच्या वऱ्हांड्याला गळती लागली आहे. त्यामुळे या इमारतीचे आयुष्य संपल्यात जमा आहे. प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तत्काळ पूर्ण करण्याची गरज आहे.

Web Title: Construction of 13 crore administrative building at a slow pace