संविधान जीवनपध्दती झाली पाहिजे

By Admin | Updated: January 23, 2015 01:10 IST2015-01-23T01:10:25+5:302015-01-23T01:10:25+5:30

संवीधान आपली जीवन पध्दती असली पाहिजे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होणार नाही व सर्व नागरीकांमध्ये संविधानाच्यानुसार वागण्याची प्रेरणा आपोआप मिळेल.

Constitution should be done | संविधान जीवनपध्दती झाली पाहिजे

संविधान जीवनपध्दती झाली पाहिजे

दिघोरी/मोठी : संवीधान आपली जीवन पध्दती असली पाहिजे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होणार नाही व सर्व नागरीकांमध्ये संविधानाच्यानुसार वागण्याची प्रेरणा आपोआप मिळेल. यामुळे समाजात भांडणे, वादविवाद कमी होतील असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश क स्तर भंडारा जि. आर. कोलते यांनी केले
दिघोरी मोठी येथे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात नागरीक व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले शालेय जिवनात कुठेही कायदयाचे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे आज मुद्दामच शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा कायदयाची जाणीव व्हावी यासाठी आपल्या समोर कायदयाचे महत्व पटवून देत आहे. पुढे ते म्हणाले, माणूस आपले कर्तव्ये हे कायदयाच्या चौकटीत करीत नसल्याने आज मोठ्या प्रमाणात कायदयाचे उल्लंघन होऊन कोर्टात खटल्यांचे प्रमाण वाढले आहे. म्हणून कायदयाच्या योग्य ज्ञान आत्मसात करुन आपल्या जीवनात त्यांचा अंगीकार केल्यास सामान्य जीवन जगतांनी आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहणार नाही.
तालुका विधी सेवा समिती तालुका लाखांदूर यांचे पुढाकाराने आज दिघोरीत मार्गदर्श शिबिर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर सरपंच शंकरराव खराबे, उपसरपंच देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंता हटवार जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सुखदेवे यांनी जेष्ठ नागरिक ओळखपत्राबाबत माहिती दिली. तसेच मेश्राम यांनी मुलभूत कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले तर जे. डी. राऊत यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन टि. एम. कोरे यांनी केले तर आभार एम. देशमुख यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Constitution should be done