प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करा

By Admin | Updated: July 27, 2016 00:40 IST2016-07-27T00:40:53+5:302016-07-27T00:40:53+5:30

गोसीखुर्द प्रकल्प धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नहराचे काम कासवगतीने सुरू आहे.

Consider the requests of project-affected people | प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करा

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करा

दुर्लक्ष : पारबता डोंगरे यांची मागणी
चिचाळ : गोसीखुर्द प्रकल्प धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नहराचे काम कासवगतीने सुरू आहे. दरम्यान गोसे प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा तसेच घराचा मोबदला एकाचवेळी न देता टप्पाटप्प्याने देत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना वेळोवेळी कार्यालयीन कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी गैरसोयीचे होत आहे. प्रकल्पग्रस्तांना कुटूंबाचे पुर्नवसन करण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. प्रकल्पग्रस्तांना मिळणारा मोबदला एकाचवेळी द्या, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पारबता डोंगरे यांनी केली आहे.
गोसे प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्या जमिनीचा मोबदला सर्वप्रथम कवडीमोल भावाने दिला आणि प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू झाला. सुरूवातीपासूनच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार झाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त योग्य प्रकारे पुर्नवसन करू शकला नाही. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली बरीच प्रकरणे प्रलंबित आहे. त्यांच्या घराला मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. गोसे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान अनेक प्रकल्पग्रस्तांना वेठीस धरून अनेकांना मोबदल्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना कायदेशीर मागण्यासाठी न्यायालयाचा आश्रय घेऊन तर प्रकल्पग्रस्त अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्तांना सुरवातीपासून शेतीचा व घराचा योग्य मोबदला, शासकीय सेवेत नोकरी व पुनर्वसनाच्या ठिकाणी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे देण्याची गरज होती. शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार केला नसल्याचा आरोपही पारबता डोंगरे यांनी केला. (वार्ताहर)

Web Title: Consider the requests of project-affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.