वनरक्षक निलंबित
By Admin | Updated: July 5, 2014 00:13 IST2014-07-05T00:13:14+5:302014-07-05T00:13:14+5:30
लाखनी वनपरिक्षेत्रातील संरक्षीत वनातील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी...

वनरक्षक निलंबित
लाखनी : लाखनी वनपरिक्षेत्रातील संरक्षीत वनातील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी शेतकरी, ठेकेदार याच्यासह नऊ अन्य
जणांना अटक करून वन कस्टडी रिमांड देण्यात आली.
ही घटना पाच दिवसांपूर्वी उजेडात येताच वनविभागात एकच खळबळ माजली. या घटनेचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी नागपुहून
मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक टेंभुर्णीकर यांच्या संपूर्ण वनविभागाची यंत्रणा कामी लागली व कालच घटनास्थळाची पाहणी केली.
मागील महिन्यात रेंगेपार कोठा येथील शेतकऱ्याच्या मालकीचे व गोडसावरी येथील रतिराम हजारे या मालकी जमिनिला लागून कक्ष
क्रमांक १०९ व गट क्रमांक ४८५ मधील २७ झाडे तोडण्यात आली. वृक्षाच्या परवानाबाबत वनविभागाच्या सर्वेक्षणात २७ झाडे
संरक्षित वनाच्या हद्दीत आहे. हे लक्षात येताच हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेवून
संपूर्ण मुद्देमाल जप्त करून गडेगाव डेपो येथे जमा केला. त्यानंतर शेतकरी व ठेकेदार यांना अटक करून न्यायालयात हजर
करण्यात आले. यात दोघानाही ४ दिवसाचा वन कस्टडीरिमांड मिळाला. या कालावधीत तपास कार्यात झाडे कापणारे मजुर कोठा
वाहतुक करणारे कोण, या तपासात तिलकचंद रहांगडाले (२६), महादेव राणे (५०), प्रकाश पुराम (४२), महेश पुराम (२२), सुकदेव
बघेले (३६) खुर्शीपार, वसुराज तितरमारे, विनोद भंडारी (२५), श्रीकृष्ण मंडकाम (२२) यांना अटक करून सत्र न्यायालयात हजर
करण्यात आले. यातील वसुराज, विनोद, श्रीकृष्ण यांना जमानतीवर सोडून उर्वरित शेतकरी रतिराम हजारे (४५) ठेकेदार राकेश
(२५) व अन्य ६ जणांना तपासा सरस व्हावा याकरिता १ दिवसाचा एफसीआर उद्यापर्यंत ठेवण्यात आला. आरोपी ठेकेदाराने
वनविभागाच्या रेंगेपार कोठा येथील सागवान वृक्षाची खरेदी केली होती. त्यानुसार वनविभागाने त्याला वृक्षतोड करून वाहतुक
करण्याचा परवाना देण्याची कार्यवाही सुरू केली होती. मात्र ठेकेदाराने या झाडासोबत गोडसावरी येथील गट क्रमांक ४८५ मधील
२१ झाडाची अवैध कत्तल केली. याबाबत वनविभागाने सर्वेक्षण करून झाडे लावण्यास मज्जाव केला होता, असे सांगितले. मात्र
शेतकरी व ठेकेदार यानी चोरी छुपे झाडे कापून त्या झाडाची वाहतूक केली. (शहर प्रतिनिधी)