समाज आणि तरुणांना जोडल्यामुळे समाज समृद्ध होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:44+5:302021-03-07T04:32:44+5:30
भंडारा येथील आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या प्रांगणात महाराणा प्रताप मेमोरियल ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने क्षत्रीय राजपूत राष्ट्रीय युवा-युवती ...

समाज आणि तरुणांना जोडल्यामुळे समाज समृद्ध होईल
भंडारा येथील आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या प्रांगणात महाराणा प्रताप मेमोरियल ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने क्षत्रीय राजपूत राष्ट्रीय युवा-युवती परिचय परिषद आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंदनसिंग रोटेले होते. प्रमुख अतिथी म्हणून बिहारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिंह, युनेस्कोचे सदस्य, ग्वाल्हेरचे निहालसिंह चौहान, प्रतिभा राणा, डॉ. सिंह राजपूत, भागवतसिंग. डॉ. सरला शनवरे उपस्थित होते .
परिषदेत युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचवेळी विविध क्षेत्रातील सक्रिय आणि समाजबांधवांच्या कार्याबद्दलही त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंदनसिंग रोटेले म्हणाले की, समाजातील अनेकांनी समाजाला जोडण्यासाठी परिषद आयोजित करून स्वत:चे व समाजाचा गौरव केला आहे. अयोध्येच्या महाराणा प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आपल्या समाजाप्रति सद्भावना, बंधुता, सहकार्य, मार्गदर्शन आणि सेवाकार्य पाहता सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्य आणि समाज एकमेकांचे पूरक आहेत. दोघेही समाजाच्या विकासासाठी एकत्र काम करतात.
परिषदेत प्रामुख्याने ललितसिंह बाच्छिल, विवेक बाच्छिल, धीरजसिंग बैस, विनयसिंग सोलंकी, डॉ. मधुकर निकम, डॉ. आरती पवार, प्रा. अमोलसिंग रोटेले, नंदकिशोर भगत, शरदसिंग बेस, रमेशसिंग चौहान, महेनसिंग सिसोदिया, मनोजसिंग पवार, जगदीशसिंग चौहान, नितीन पाके, अर्चना बच्छिल, चंदा परदेशी, ममता निगम आदी उपस्थित होते. संचालन डॉ. आरती पवार यांनी केले.