शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

काँग्रेसचा जनंसपर्क अभियान उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:47 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार जिल्ह्यातही काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्रानुसार जनसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. यात भंडारा विधान सभा क्षेत्रातील धारगाव येथून काँग्रेसने जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देदारोदारी प्रचार मोहीम : केंद्र व राज्य सरकारच्या जनता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार जिल्ह्यातही काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्रानुसार जनसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. यात भंडारा विधान सभा क्षेत्रातील धारगाव येथून काँग्रेसने जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे.या अभियानाचे उद्घाटन प्रदेश कमेटीचे महासचिव तथा विदर्भ विभागीय जनसंपर्क अभियानाचे समन्वयक जिया पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटक जिया पटेल म्हणाले की, केंद्र शासन व राज्य शासनाच्या भ्रष्टाचाराच्या तसेच युपीए सरकारची कामे व एनडीए सरकारची कामे यामधील फरक लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचे कार्य सुरु आहे. याशिवाय जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाने दिलेली माहिती घराघरापर्यंत पोहचविण्याचे काम सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहनही त्यांनी भाषणातून केले.जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर म्हणाले, भाजप सरकारने युवकांना व शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केले आहे. भाजप शासन फक्त आश्वासनाचे गाजर देत आहे. प्रत्यक्ष कृतीत मात्र हे सरकार सपेशल फेल ठरले आहे.धारगाव येथे घरोघरी जावून पॉम्प्लेट वाटप करुन भाजप सरकारच्या विरोधात जनसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून भंडारा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजकपूर राऊत यांनी जनसंपर्क अभियानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यात पक्षाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. संचालन सचिन घनमारे यांनी तर आभार जि.प. सदस्य निलकंठ कायते यांनी मानले.याप्रसंगी माजी सभापती विकास राऊत, विधानसभा बुथ समन्वयक प्रकाश पचारे, पवनी तालुकाध्यक्ष शंकर तेलमासरे, जि.प. सभापती प्रेम वनवे, रेखा वासनिक, माजी सभापती हंसाताई खोब्रागडे, विनायक बुरडे, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, माजी नगरसेवक धनराज साठवणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कारेमारे, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष भुषण टेंभुर्णे, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव सुहास गजभिये, डॉ. माधवराव मस्के, जगदिश कडव, घनश्याम भांडारकर, इरफान पटेल, जनार्धन निंबार्ते, राजु सुर्यवंशी, शर्मिल बोदेले, मंगेश हुमणे, भिमराव निंबार्ते, महेश कोराम, पृथ्वी तांडेकर, जीवन भजनकर, सतीश कायते, उमेश सार्वे, इस्तारी कहालकर, राकेश महारवाडे, पराग खोब्रागडे, प्रविण भोंदे, नत्थु क्षिरसागर, केवल वंजारी, रामेश्वर मते, विलास वंजारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस