मापिसा कायदा विरोधात काँग्रेसचे निदर्शने

By Admin | Updated: September 8, 2016 00:35 IST2016-09-08T00:35:04+5:302016-09-08T00:35:04+5:30

राज्य शासनातर्फे महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सिक्युरिटी एक्ट २०१६ मापिसा या कायद्याचा मसुदा जाहिर करण्यात आला.

Congress's demonstrations against the MPISA law | मापिसा कायदा विरोधात काँग्रेसचे निदर्शने

मापिसा कायदा विरोधात काँग्रेसचे निदर्शने

मोहाडी : राज्य शासनातर्फे महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सिक्युरिटी एक्ट २०१६ मापिसा या कायद्याचा मसुदा जाहिर करण्यात आला. हा कायदा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तसेच आंदोलन चिरडण्यााठी बनविण्यात आल्याचा आरोप करून हा कायदा रद्द करावा, यासाठी मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यानंतर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले व तहसीलदार धनंजय देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
या कायद्यात १०० पेक्षा जास्त समुदाय असलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी बंधनकारक करण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांवर लादण्यात आली आहे. लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, वाढदिवस आदी सारखे घरगुती कार्यक्रमावर यामुळे बंधन येईल. पोलिसांविरूद्ध टिका करता येणार नाही.
नाटक, चित्रपट, पथनाट्य अथवा मनोरंजनात्मक कार्यक्रमात पोलिसांचा पेहराव घालण्यास बंधन टाकण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या चुकीच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही, जनआंदोलन, रास्तारोको, बंद सारख्या आंदोलनांना रोखण्यासाठी पोलिसांना ज्यादा अधिकार देण्यत आलेले आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असून सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याने हा कायदा रद्द करावा, अशी मागणी मोहाडी तालुका काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभू मोहतुरे, मनोहर सिंगनजुडे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, महिला काँग्रेस अध्यक्ष सिमा भुरे, न.प. उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे, जिल्हा दुग्ध संचालक आशिष पातरे, प्रमोद तितीरमारे, अमरनाथ रगडे, वामन थोटे, देवेंद्र इलमे, महेश निमजे, गिता बोकडे, अरुणा श्रीपाद, कविता बावणे, ज्योती चिंधालोरे, दिपक नागदेवे, अजीत गजभिये, दुर्याेधन अटराये, प्रदीप वाडीभस्मे, राजन सिंगनजुडे, संतोष मोहतुरे, कैलास पिकलमुंडे, प्रकाश धार्मिक, अनुप उटाणे, मिलिंद नागदेवे, के.के. पंचबुद्धे, बोधानंद, देवराम बोंदरे, वंदना मेश्राम, मिना निखारे, रागीनी सेलोकर, डुलीचंद लिल्हारे, ग्यानीराम शेंडे, राजेश गभने, वेदान्ता गंगाभोज, विनोद वैद्य, गणेश निमजे, वंदना मेश्राम, प्रकाश धार्मिक, देवराम बोंदरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Congress's demonstrations against the MPISA law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.