काँग्रेस कार्यकारिणीत भंडाऱ्याला झुकतेमाप
By Admin | Updated: April 17, 2016 00:21 IST2016-04-17T00:21:34+5:302016-04-17T00:21:34+5:30
प्रदेश काँगे्रेस कमिटीच्या जम्बो कार्यकारिणीत जिल्ह्याला झुकतेमाप मिळाले असून सहा जणांची वर्णी लागली आहे.

काँग्रेस कार्यकारिणीत भंडाऱ्याला झुकतेमाप
भंडारा : प्रदेश काँगे्रेस कमिटीच्या जम्बो कार्यकारिणीत जिल्ह्याला झुकतेमाप मिळाले असून सहा जणांची वर्णी लागली आहे. परंतु यात काही घटकांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर माणिकराव ठाकरे यांची उचलबांगडी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे संघटनेची सूत्रे आली. त्यानंतर वर्षभर कामे सुरू होती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिक्कामोर्तबानंतर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रभारी जिल्हाध्यक्ष जिया पटेल यांची महासचिवपदी तर प्रमिला कुटे व प्रमोद तितीरमारे यांची सचिवपदी तर मार्गदर्शक म्हणून माजी खासदार केशवराव पारधी व माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्याला अत्यल्प स्थान मिळत होते. यावेळी मात्र झुकतेमाप देण्यात आले.
(जिल्हा प्रतिनिधी)
वाघाये बनणार जिल्हाध्यक्ष !
जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या विजयाचे श्रेय माजी आमदार सेवक वाघाये यांना जाते. जिल्हाध्यक्षपदी त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा महासचिव प्रेमसागर गणवीर यांच्याही नावाची चर्चा आहे. परंतु वाघाये यांना जिल्हाध्यक्षपद देऊ करण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे त्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नसल्याचेही सूत्राने सांगितले.