काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली शपथ

By Admin | Updated: November 17, 2014 22:48 IST2014-11-17T22:48:37+5:302014-11-17T22:48:37+5:30

भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान स्व.पंडीत जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंतीनिमित्त आदरांजली हुतात्मा स्मारक भंडारा येथे

Congress office bearers took oath | काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली शपथ

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली शपथ

मार्गदर्शन : स्वातंत्र्य, एकता आणि अखंडतेचे रक्षण करा
भंडारा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान स्व.पंडीत जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंतीनिमित्त आदरांजली हुतात्मा स्मारक भंडारा येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली.
सर्वप्रथम नेहरुजींच्या फोटोला माल्यार्पण करून पूजा अर्चना करण्यात आली. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी ड्रीम डेल शाळेचे विद्यार्थ्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व समावेशक लोकशाही आणि देशवासीयांच्या सशक्तीकरणासाठी पंडीत नेहरुजींच्या वचनाला बांधील राहण्याची आणि कठोर परिश्रमानंतर प्राप्त झालेले स्वातंत्र, एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्याची सत्य निष्ठापूर्वक शपथ घेतली आहे. कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, बशीर पटेल, सचिन घनमारे, राजकुमार राऊत, राजकुमार मेश्राम, शमीम शेख, धर्मंेद्र गणवीर, अजय गडकरी, अभिजीत वंजारी, प्रा.मारबते, एच.एल. लांजेवार, गजानन सूर्यवंशी, डॉ.विनोद भोयर, पुष्पा मेश्राम, आशा हरडे, प्रशांत सरोजकर, प्रकाश डोेंकर, इमरान पटेल, नाहीद परवेज, शर्मिल बोदेले, अशोक देवगडे, निश्चल येनोरकर, महेंद्र वाहणे, गणेश लिमजे, महमूद खान, शब्बीर खार, छोटू मामू, मोहीत कुरैशी, निखील कुंभलकर, जयेश बोरकर, जयंत जिभकाटे, प्रेमानंद बोरकर, भावना शेंडे, भारती लिमजे, शमीम पठाण, शोभीभाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ड्रीम डेल शाळेचे प्राचार्य भाष्कर यांच्या नेतृत्वात शाळेचे विद्यार्थी व शिक्षकगण उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Congress office bearers took oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.