काँग्रेसला यावर्षीची कोजागिरी लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 21:53 IST2018-10-28T21:53:20+5:302018-10-28T21:53:40+5:30
पवनी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोजागिरी कार्यक्रम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सोबत आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी एबीव्हीपी संघटना सोडून एनएसयुआय संघटनेत प्रवेश घेतला. त्यामुळे यावर्षीची कोजागिरी ही काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देणारी ठरली.

काँग्रेसला यावर्षीची कोजागिरी लाभदायक
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवनी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोजागिरी कार्यक्रम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सोबत आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी एबीव्हीपी संघटना सोडून एनएसयुआय संघटनेत प्रवेश घेतला. त्यामुळे यावर्षीची कोजागिरी ही काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देणारी ठरली.
गांधीभवन पवनी येथे आयोजित कोजागिरी कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या अध्यक्षतेखाली पवनीचे माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसचे सचिव प्रकाश पचारे, जि.प. माजी सभापती विकास राऊत, प्रगती नागरि पत संस्थेचे अध्यक्ष विजय रायपुरकर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, जि.प. माजी सदस्य मोहन पंचभाई, शंकरराव मुनरतीवार, नगरसेवक गोपाल नंदरधने, ताराचंद तुळसकर, राकेश बिसने, वंदना नंदागवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी पवनी शहर युवक काँग्रेसचे नवीन कार्यकर्ते सक्रीय होऊन युवक काँग्रेस संघटन तयार करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी एबीव्हीपी संघटना सोडून एनएसयुआय संघटनेत प्रवेश घेतला. त्यावेळी पवनी शहर युवक काँग्रेसचे मंगेश भोयर यांच्या नेतृत्वाखाली धनंजय भोयर, धनराज खडसे, अजय डोंगरे, किशोर दिघोरे, तुषार भोगे, अक्षय बिसेन, फजल खान, ऐफाज अली युवक काँग्रेसची कार्यकारिणी गठण करण्यात येऊन बंडूभाऊ सावरबांधे आणि प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते काँग्रेसचे दुप्पटे व टोपी घालून सत्कार करण्यात आला.
एबीव्हीपीच्या कार्याला व हुकुमशाहीला कंटाळून ४० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एबीव्हीपी संघटनेला रामराम ठोकून महेश नान्हे यांच्या नेतृत्वाखाली तुषार भोगे, मंगेश वंजारी, राहुल जिभकाटे, शुभम कारंभे, दिगांबर नागपुरे, गौरव धुर्वे, असलम शेख, अखिल मुंडले, इरफान शेख, अलताफ पटेल, विष्णू बावनकर, सूरज मेश्राम, आशिष मेश्राम, हिमांशू थोटे, निशांत शिवरकर व इतर विद्यार्थ्यांनी काँग्रेसच्या एनएसयुआय संघटनेमध्ये प्रवेश घेऊन पवनी शहर एनएसयुआय संघटन मजबूत करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या एनएसयुआयच्या माध्यमातून सोडविण्याची शपथ घेतली. या ४० विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बंडूभाऊ सावरबांधे, विकास राऊत, मोहन पंचभाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश पचारे तर आभार शशीकांत भोगे यांनी केले.