१०० पेक्षा जास्त दिवस लोटले तरी केंद्र सरकारला जाग आलेली नाही. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रूपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रूपयांवर झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. म्हणून तीन काळे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंद पुकारला. या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार पवनी शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी चौक पवनी येथे सकाळी ११ ते दु. ४ वाजता पर्यंत उपोषण करण्यात आले .
उपोषणाला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विकास राऊत,अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसचे सचिव प्रकाश पचारे, तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर तेलमासरे, मनोहर उरकुडकर, आनंद वाहने, प्रकाश भोंगे, अवनती राऊत, डॉ. विकास बावनकुळे, विजय रायपूरकर, नगरसेवक गोपाल नंदरधने, धर्मेंद्र नंदरधने, हंसा खोब्रागडे, महेश नान्हे, अक्षत नंदरधने, नरेंद्र बिलावणे, लीनेश सेलोकर, जयपाल नंदागवळी, शशिकांत भोंगे, किशोर भोयर, रमेश पंचभाई, योगेंद्र टेंभूर्णे, आशिष रायपूरकर, जया भाजीपाले, नंदा सुतारे आणि पवनी तालुक्यातील व शहरातील कॉंग्रेस कमिटी, सेवादल ,युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय.इंटक, असंघटीत कामगार संघटन, अल्पसंख्यांक विभाग, अनुसुचीत जाती विभाग, किसान सेल, ओबीसी सेल व इतर सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणाला उपस्थित होते.