दागिन्यांच्या वाटपाविषयी खातेदारांमध्ये संभ्रम

By Admin | Updated: May 13, 2015 00:58 IST2015-05-13T00:58:08+5:302015-05-13T00:58:08+5:30

सिहोरा येथील हिरालाल हेडावू या सावकारांच्या हत्याकांडात जप्त करण्यात आलेली दागीने तब्ब्ल दीड वर्षानंतरही खातेदारांना परत मिळाले नसल्याने ..

Confusion among account holders about jewelery distribution | दागिन्यांच्या वाटपाविषयी खातेदारांमध्ये संभ्रम

दागिन्यांच्या वाटपाविषयी खातेदारांमध्ये संभ्रम

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा येथील हिरालाल हेडावू या सावकारांच्या हत्याकांडात जप्त करण्यात आलेली दागीने तब्ब्ल दीड वर्षानंतरही खातेदारांना परत मिळाले नसल्याने चिंता वाढल्या आहेत. साहित्य ठेवीच्या पावत्या ही जीर्ण होत असल्याने खातेदारांमध्ये चिंता वाढली आहे.
सिहोरा येथील सावकार हिरालाल हेडावू यांची सन २०१३ मध्ये हत्या झाली होती. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक तथा शेतकरी यांनी सावकार हेडावू यांच्याकडे दागीने गहाण ठेवली आहेत. अशी एकूण १५०० खातेदार आहेत.
दरोडेखोरांनी सावकर हेडावू यांची हत्या केल्यानंतर दागीने तथा रोख पळविली होती. पोलिसांच्या शोध मोहिमेत आरोपी आणि दागीने सापडली आहेत. आरोपी कारागृहात असून दागीने तथा दस्तऐवज पोलिसांच्या सुरक्षेत आहे. या हत्याकांडाला तब्बल दीड वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. परंतु साहित्य वाटपाचा निर्णय लागलेला नाही. यामुळे खातेदार कासावित होत आहे.
यात कुणाची अंगठी, मंगळसुत्र, बांगड्या यासह अन्य साहित्यांचा आहे. उपवर मुलींच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेले दागीने आहेत. दिवंगत सावकार हेडावू यांचे दस्तऐवजात या साहित्यांची नोंद आहे. परंतु ज्यांचे दागीने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. अशा मुलींचे लग्न कार्यही पार पडली आहेत, मात्र दागिने मिळालेले नाहीत.
दरम्यान दिवंगत सावकार हेडावू यांचे पुत्र अविनाश हेडावू यांनी खातेदारांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दागीने आणि दस्तऐवज तथा अन्य वस्तु सुपूर्द करण्याचे न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच, वाटपाची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
खातेदारांनी साहित्य गहाण ठेवल्याची पावती सुरक्षीत तथा सांभाळून ठेवण्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अनेक खातेदारांच्या पावत्या गहाळ झालेल्या आहेत तर अनेक पावत्या जीर्ण झाल्याने खातेदारांमध्य धास्ती वाढली आहे. दागीने वाटपासाठी खातेदार सावकार पुत्राला रोज संपर्क साधत आहेत. खातेदारांना प्रामाणिक पणे तथा न्यायालयाच्या आदेशान्वये दागीने परत केली जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Confusion among account holders about jewelery distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.