बक्षीसपत्राच्या नोंदणीवरून संभ्रम

By Admin | Updated: June 2, 2015 00:29 IST2015-06-02T00:29:24+5:302015-06-02T00:29:24+5:30

बक्षिसपत्र करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तेथील अधिकारी दोन टक्के शुल्क भरण्यासाठी...

Confusion about the prize winner | बक्षीसपत्राच्या नोंदणीवरून संभ्रम

बक्षीसपत्राच्या नोंदणीवरून संभ्रम

मोहाडीतील प्रकार : पदाधिकारी विरूद्ध अधिकारी
मोहाडी : बक्षिसपत्र करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तेथील अधिकारी दोन टक्के शुल्क भरण्यासाठी सांगतात तर या तुमसर क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे नवीन अध्यादेशाप्रमाणे केवळ २०० रूपयात बक्षिसपत्र होते, असे सांगतात. यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, आ.चरण वाघमारे यांनी शासनाकडे नोंदणी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली असून आम्ही योग्य आकारणी करीत असल्याचे नोंदणी अधिकारी सांगत आहेत. २४ एप्रिल २०१५ च्या नवीन अध्यादेशात पृष्ठ १० मधील क्रमांक १८ मधील अनुच्छेद ३४ मधील तरतुदीत रक्त नाल्यातील व्यक्तींना केवळ २०० रूपयात निवासी अथवा कृषी मालमत्ता बक्षिसपत्र करता येईल, असा उल्लेख आहे. मात्र त्यात नोंदणी शुल्क व स्थानिक शुल्काचा उल्लेख नाही. यामुळे दुय्यम निबंधक हे बक्षिसपत्र करणाऱ्यांना एक टक्का नोंदणी शुल्क व एक टक्का स्थानिक शुल्क असे दोन टक्के मालमत्तेचा किमतीवर आकारणी करीत आहेत. मात्र यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
आ.वाघमारे यांनी ३० मे रोजी मोहाडी तहसिल कार्यालयातील दुय्यम निबंधकांना बोलावून बक्षिसपत्र, आपसी हिस्सेवाटणी २०० रूपयात करण्यासाठी सांगितले. मात्र निबंधक कार्यालयाच्या मते हा नवीन अध्यादेश मुद्रांक शुल्काबाबत आहे.
मुद्रांक शुल्क कमी करून २०० करण्यात आला. विक्रीपत्र तसेच इतर बाबतीत ज्याप्रकारे स्थानिक कर व नोंदणी शुल्क घेण्यात येतो तसाच बक्षिसपत्राच्या बाबतीत आहे. याच अध्यादेशात क्रमांक १६ मध्ये विक्रीपत्रासाठी तीन टक्के शुल्क घेण्याचे निर्देश आहेत मात्र आम्ही एक टक्का स्थानिक कर व एक टक्का नोंदणी शुल्क असे पाच टक्के नोंदणी व मुद्रांक अधिनियमाप्रमाणे आकारणी करतो. त्यामुळे २०० रूपयात बक्षिसपत्र करता येणार नाही, मात्र हिस्से वाटणीपत्र २०० रूपयात करता येते, असे नोंदणी विभागाचे म्हणने आहे. (शहर प्रतिनिधी)

जनतेच्या सुविधेसाठी राज्य शासनाने आपसी हिस्से वाटणी व बक्षिसपत्र केवळ २०० रूपयात नोंदणी करण्याची सोय करून दिली आहे. मात्र नोंदणी अधिकारी जनतेला त्रास देत असून या अधिकाऱ्यांची शासनाकडे तक्रार केली आहे. जनतेने २०० रूपयातच हिस्सेवाटणी व बक्षिसपत्र करून घ्यावे.
- चरण वाघमारे,
आमदार, तुमसर.

मुद्रांक व नोंदणी अधिनियमानुसार एक टक्का स्थानिक कर व एक टक्का नोंदणी शुल्क घेतला जातो. नवीन अध्यादेशानुसार बक्षिसपत्र करताना मुद्रांक शुल्क २०० रूपये करण्यात आले आहे. स्थानिक कर व नोंदणी शुल्कात सुट देण्यात आलेली नाही. हिस्से वाटणी मात्र २०० रूपयातच करण्यात येत आहे.
- राजेश देशकर,
सहजिल्हानिबंधक, भंडारा.

Web Title: Confusion about the prize winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.