समता नगरातील बगिच्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:35+5:302021-07-15T04:24:35+5:30
भंडारा : समता नगर फेज २ या वसाहतीत असलेल्या बगिच्याची सध्या दुरवस्था झाली आहे. येथील खेळण्याच्या व व्यायामाच्या मोडतोड ...

समता नगरातील बगिच्याची दुरवस्था
भंडारा : समता नगर फेज २ या वसाहतीत असलेल्या बगिच्याची सध्या दुरवस्था झाली आहे. येथील खेळण्याच्या व व्यायामाच्या मोडतोड झाली असून सभोवताली गवत, झुडपे वाढली आहेत. स्थानिक प्रभागातील नगरसेवकांनी या बगिच्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती राऊत व रहिवासी यांनी केली आहे.
मेंढा रोडवर समता नगर फेज २ ही वसाहत आहे. याठिकाणी संबंधित लेआऊट मालक प्रभात गुप्ता यांनी बगिच्याची निर्मिती केली होती. येथे पूर्वी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची साधने होती. दररोज सकाळी व संध्याकाळी या वसाहतीसह परिसरातील नागरिक येथे व्यायामासह फेरफटका मारायला येतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत या बगिच्याची अवस्था दयनीय झाली आहे. परिसरात रानगवत व खुरटी काटेरी झाडे वाढल्याने यात विषारी जिवांचे वावर असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू शकते. प्रौढांकरिता बसण्याच्या खुर्च्यांची मोडतोड झाली असून बसायचं कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
*खेळण्याची साधने गंजली असून मोडतोड झाली आहे. लहान मुलांना खेळण्याचा मोह आवरेना तरीही मोडकळीस आलेल्या खेळण्याच्या साधनावर हौस भागवली जाते. त्यामुळे आता चिमुकल्यांना आपण खेळायचे काय? असा प्रश्न पडला आहे. या प्रभागातील नगरसेवकांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वसाहतीमधील नागरिकांनी बगिच्याचे सौंदर्यीकरण करून ग्रिनजीम लावण्यात यावे, अशी मौखिक मागणी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात नगरसेवकांनी कोणतेही ठोस कामे केली नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर आहे.