१० जणांविरुद्ध तडीपार प्रस्ताव
By Admin | Updated: March 24, 2015 00:12 IST2015-03-24T00:12:54+5:302015-03-24T00:12:54+5:30
शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून भंडारा पोलिसांनी ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील मागील वर्षभरात १० जणांना तडीपार करण्याचा...

१० जणांविरुद्ध तडीपार प्रस्ताव
प्रश्न कायदा व सुव्यवस्थेचा : पोलीस निरीक्षक चांदेवार यांची माहिती
भंडारा : शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून भंडारा पोलिसांनी ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील मागील वर्षभरात १० जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरु असून अंतिम हद्दपार आदेश निर्गमित होणार असल्याची माहिती भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी दिली. पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चांदेवार म्हणाले, शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ज्या व्यक्तींवर तीन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांना भंडारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याविषयीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. सन २०१४ मध्ये अशा सहा जणांविरुद्ध हद्दपार प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. यामध्ये हर्षल मेश्राम (वरठी), प्रवीण उदापुरे (भंडारा), दिनेश राठोड (वरठी), मोहम्मद अफसर अली सरताज अली (भंडारा), अभय देवेंद्रसिंह तोमर, विशाल देवेंद्रसिंह तोमर (सर्व रा.भंडारा) अशी त्यांची नावे आहेत. जानेवारी २०१५ पासून ते मार्च अखेर चार जणांना हद्दपार करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामध्ये जितेंद्र नरेंद्रसिंह तोमर, मनोज कमलकिशोर कुशवाह, वसीम ऊर्फ टिंकू खान, सुफीयाना आलम शेख यांचा समावेश आहे. सन २०१२ मध्ये हद्दपारीचे ३ तर २०१३ मध्ये दोन प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. यापैकी एकाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)